विनयभंग करणाऱ्या आरोपीतांना कोर्टातून शिक्षा

काटोल :- फिर्यादी / पिडीता यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. काटोल येथे अप. क्र. १२९/२०१३ कलम ३५४ (अ) (१), ५०६ भा.द.वी. सहकलम ८ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील पिडीता / फिर्यादी व आरोपी हे एकाच गावात राहत असुन यातील पिडीता ही तिचे मोहल्यातील राहणाऱ्या आरोपी श्रावण रमेश बलांसे वय २५ वर्ष याचे घरी तिचे मोठ्या भावाचे पेन्ट आणण्यासाठी गेली असता आरोपी मंगेश धनराज वरखडे वय २३ वर्ष दोन्ही रा. अर्जुन नगर काटोल हा पण तेथेच हजर होता. दोन्ही आरोपीतांनी संगनमत करून पिडीताचे हात पकडले व फिर्यादीचा विनयभंग केला. तेव्हा पिडीता ही आरोपीतांचे हाताला झटका मारून घरी पळुण आली. त्यानंतर पुन्हा आरोपीतांनी दिनांक ३०/०६/२०१३ चे २०.०० वा. रोजी फिर्यादीच्या घरी जावुन पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली तर तुला जिवाने मारून टाकीन अशी धमकी दिली.

सदर प्रकरणाचे तपास पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा.अतिरीक्त सत्र न्यायाधीश जयस्वाल सो. कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक १६/०९/२०२३ रोजी मा. अतिरीक्त सत्र न्यायाधीश जयस्वाल सो यांनी वरील दोन्ही आरोपीतांना कलम ३५४ (अ) भादंवी मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व ५००/- रु दंड. दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद तसेच कलम ५०६, ३४ भादंवी मध्ये ०६ महिणे सश्रम कारावास व २००/- दंड. दंड न भरल्यास ०७ दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकारचे वतीने एपीपी खापर्डे यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणुन पोशि व. नं.४०५ प्रमोद कोहळे पो.स्टे काटोल यांनी मदत केली आहे.

NewsToday24x7

Next Post

खापरखेडा येथे दंगा करुन खुनाचा प्रयत्न करणारे मुख्य आरोपी अटकेत

Tue Sep 19 , 2023
– स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई नागपूर :- सुधीर रज्जू इंगळे याचे कुटुंबातील सदस्यावर पोलिसांकडे मुखबिरी करित असल्याचा आरोप करून व त्या संबंधाने फिर्यादीच्या पत्नीने दादा तेलंगे, बुध्द तेलंगे विरुद्ध दिलेल्या रिपोर्टच्या बदला घेण्यासाठी यातील आरोपी क्र. १) दादा तेलगे, २) बुद्ध तेलंगे, त्यांच्यासोबत आरोपी क्र. ३) रितिक दुपारी ४) गणेश सहारे, ५) रुपेश फाटा, तसेच दादा तेलंगे यांचे […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com