संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर रेल्वे फाटक जवळील चंभार नाला जवळील रेल्वे रुळावर दोन अनोळखी व्यक्तीचा अज्ञात रेल्वे गाडीच्या धडकेने अपघाती मृत्यु झाल्याची घटना गतरात्री साडे आठ दरम्यान उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे हलविण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून दोन्ही मृतकाची ओळख अजूनही पटलेली नाही. छायाचित्रात नमूद वर्णनाचा इसम ओळखीचे पटल्यास नवीन कामठी पोलीस स्टेशन ला संपर्क साधावे असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी केले आहे.