भविष्यातील आव्हाने ओळखून तक्रारी आणि समस्यांचे निराकरण करा – दिलीप दोडके

नागपूर :- मानव संसाधन विभागातील अधिकार्‍यांनी भविष्यातील आव्हाने ओळखून, कर्मचार्‍यांच्या तक्रारी आणि संबंधित समस्यांचे नियोजित वेळेनुसार निराकरण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले.

नागपूर परिमंडला अंतर्गत असलेल्या मानव संसाधन विभागातील सर्व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. आपले दैनंदिन काम नियोजित पद्धतीने करतांना कर्मचार्यांची उच्चपद श्रेणी, त्यांचे दावे आदी कामात कुठलाही विलंब न करता सर्व प्रलंबित दाव्यांचा निपटारा येत्या ३० सप्टेंबर पूर्वी करण्याच्या सूचना देखील दोडके यांनी उपस्थितांना केल्या.

या बैठकीला नागपूर परिमंडलाचे सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) प्रदीप सातपुते, वरिष्ठ व्यवस्थापक विवेक बामनोटे, व्यवस्थापक कुणाल गजभिये, यांच्यासह नागपूर शहर मंडलच्या व्यवस्थापक श्रीमती सारिका तायडे, नागपूर ग्रामीण मंडलाच्या व्यवस्थापक अनुष्री पांडे आणि वर्धा मंडलचे व्यवस्थापक प्रफुल गिरी यांच्यासह मानव संसाधन विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रवाशाचा मोबाईल चोरून विक्रीचा प्रयत्न

Tue Sep 5 , 2023
– तीन मोबाईल, पर्स जप्त – सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटकhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 नागपूर :- साखर झोपेत असलेल्या प्रवाशाचा मोबाईल चोरी करून क्लॉक रूमच्या कर्मचार्‍याला विक्रीचा प्रयत्न केला. मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावर ही चोरीची घटना घडली. आरपीएफच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून त्याला पकडले. संगीत सिंगमारे (30) रा. भंडारबोडी, बालाघाट असे आरोपीचे नाव आहे. कागदोपत्री कारवाईनंतर त्याला लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द केले.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com