मुंबई :- ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियाना निमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात शुक्रवारी कार्यक्रम झाला. या अभियानांतर्गत अमृत कलशांमध्ये माती, धान्य गोळा करून हे कलश ३१ ऑक्टोबरला दिल्लीला अमृतवाटिकेच्या निर्माणासाठी नेण्यात येणार आहेत.
भाजपा प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर , भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, माधवी नाईक, महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, भरत पाटील आदी यावेळी उपस्थित होते.