नागपूर :- फिर्यादी रितेश मारोती बेलखोडे वय ३८ वर्ष रा. प्लॉट न. १०१ मिनीमाता नगर, कळमणा, नागपूर यांचे नंदनवन हद्दीत आर.एम. एन्टरप्रायजेस नावाचे हार्डवेअरचे दुकान आहे. तसेच फिर्यादी यांचा व्यापारी बिजनेस नेटवर्किंग व्हाट्सअॅप ग्रुप आहे. समुद्र ग्रुप मधे आरोपी ओमकार महेन्द्र तलमले वय २५ वर्ष रा. शाहु ले आउट, दत्तवाडी, सुद्धा सदस्य असल्याने फिर्यादीची आरोपी सोबत ओळखी होवुन बोलचाल होती. दिनांक २६.१२.२०२२ चे १५,३० वा. ते दि. २६.०६.२०२३ ये १८.०० वा. चे दरम्यान आरोपीने फिर्यादीला केन्द्र शासानाचे रिसर्च सेंटर मध्ये पेटेन्ट तयार करण्याचे काम होते. तेथे ओळख असल्याचे सांगुन त्या मध्ये गुंतवणुक केल्यास सहा महिन्यात अधिक नफा देण्याचे आमीष दाखविले व फिर्यादी कडुन २० लाख रूपये बँकेचे खात्यातून घेवून फिर्यादीस कोणताही फायदा न देता व रक्कम परत न करता फिर्यादीची एकूण २०,००,०००/- ची आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या कारवरून व अर्ज चौकशीवरून पो. ठाणे सक्करदरा येथे मपोउपनि गाठे. यांनी आरोपीविरूध्द कलम ४०६, ४२०, भादवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे, पुढील तपास सुरू आहे.