कुणाच्या जीवावर बेतणार तेव्हा सीसीटीव्ही कॅमेरे लावणार का ?-प्रा प्रमोद चहांदे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी बस स्थानक चौकातून दोन दिवसांपूर्वी कुलदीप मेश्राम नामक तरुणाची ऍक्टिवा क्र एम एच 40 वाय 7397 क्रमांकाची दुचाकी कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असून यासारखे दुचाकी चोरी, मारझोड ,रोड रोमीयोगिरी सारख्या घटना दिवसेंदिवस वाढीवर आहेत ज्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या कामठी बस स्थानक चौकात असुरक्षितता वाढली आहे.तेव्हा या प्रकाराला आळा बसावा व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळन्यात सोयीचे व्हावे यासाठी कामठी बस स्थानक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे ही मागणी बरेचदा करण्यात आली.मात्र संबंधित विभाग या मागणीला दुर्लक्षित करीत नेहमी आश्वासनाची खैरात देतात तेव्हा या बस स्थानक चौकात कुणाच्या जीवावर बेतणारी घटना घडेल तेव्हा सीसीटीव्ही कॅमेरे लावणार का? अशी विचारणा रिपाई(गवई) चे नागपूर प्रदेश उपाध्यक्ष प्रा प्रमोद चहांदे यांनी केले आहे.

नागपूर जील्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहरावर तिसऱ्या डोळ्यांची नजर राहावी यासाठी शहरातील मुख्य रसत्यासह ठीकठिकानी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील हालचालीवर नजर ठेवने शक्य होते तसेच कित्येक गुन्हेगारीच्या घटना ह्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून उघडकीस आल्या आहेत.मात्र आजही कामठी शहरातील कित्येक मुख्य व वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या जागेत अजूनही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाही ही एक शोकांतीकाच म्हणावी लागेल ज्याचे प्रात्यक्षिक उदाहरण कामठी च्या बस स्थानक चौकातुन दिसुन येतो. तेव्हा आगामी निवडणुका व शहराची संवेदनशील स्थिती बघता कामठी च्या बस स्थानक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे यासंदर्भात बरेचदा प्रशासनाकडे मागणी करण्यात आली मात्र संबंधित प्रशासन या मागणिला गांभीर्याने घेत नसल्याने परिस्थिती जैसे थे च आहे.तेव्हा ही विदारक परिस्थिती कुणाच्या जीवावर बेतणार तेव्हा सीसीटीव्ही केमॅरे लागणार काय?अशी विचारणा प्रा प्रमोद चहांदे यांनी केली आहे.

कामठी बस स्थानक परिसर प्रवासी नागरिकाचे वर्दळीचे स्थान असून नुकतेच उन्हाळ्याला सुरुवात झाली असून प्रवासाची वर्दळ लागली आहे त्यातच लस्सीची क्रेज वाढल्याने लस्सी पिणाऱ्या शौकिनांची सुदधा संख्या वाढीवर आहेत.बस ने ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची दररोज रेलचेल सुरू असते.मागील पंधरा दिवसाआधी एका माथेफिरुणे कामठी बस स्टँड चौकात दिवसाढवळळ्या बस थांबवून बसचालकाला मारझोड करून बदमाशीचे प्रदर्शन केले होते. तसेच या चौकात हातात चाकू घेऊन दबंगगिरी दाखविणे हे नित्याचेच झाले आहे.या चौकात सर्वधर्मीय नागरिक चहा नाशता करण्यासाठी येत असून तरुण वर्गाचा सुद्धा मोठा जमाव असतो, त्यातच रिकामटेकडे सुद्धा आपला वेळ घालवत असतात तर येथील चहाच्या दुकानात वर्तमान स्थितीत असलेल्या निवडणूक संदर्भात चाय पे चर्चा केली जाते . या परिसरात व्यापारी वर्ग सुदधा स्थायिक आहेत .या परिसरात सकाळपासूनच नागरिकांची वर्दळ असते तसेच या परिसरात यापूर्वी स्वास्थ्य कर्मचारी कमल बढेल तसेच कांग्रेस चे पदाधिकारी तुषार दावानी याच्यावर सामुहिक प्राणघातक हल्ला झालेला आहे तसेच बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह परिसर रहिवासी कुंदन रंगारी नामक तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला तसेच या परिसरात दुचाकी चोरी , लुबाडनुक , किरकोळ मारझोड यासारख्या बहुधा घटना घडल्या आहेत तेव्हा या परिसराची संवेदनशीलता तसेच आगामी निवडणुका लक्षात घेता कुणी निर्दोष अनुचित घटनेला बळी न पडावे यासाठो कामठी बस स्थानक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे अशी मागणी जोर धरत असली तरी पोलीस विभाग यावर मौन भूमिका घेऊन बसली आहे ज्याचे आश्चर्यच वाटते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com