नरखेड :- दिनांक ०२/०८/२०२३ चे ०७:३० वा. ते दिनांक ०६/०८/२०२३ चे ११:०० वा. चे सुमारास पो.स्टे. नरखेड हद्दीतील फिर्यादीची मुलगी हि नेहमी प्रमाणे शाळेचा ड्रेस टाकुन क्रांती ज्योतीबा फुले नरखेड येथे शिकते. म्हणून शाळेत गेली त्या दिवशी पाणीच पाणी असल्याने व कामधदा नसल्याने फिर्यादीच्या घरचे सर्वजण घरीच हजर होते. मुलगी ही नेहमी प्रमाणे ०५.०० वा. घरी येते परंतु रात्री ०८.०० वा. तरीपण मुलगी घरी न आल्याने तिचा ईकडे तिकडे गावात शोध घेतला नातेवाईकांमध्ये फोन लावून विचारपुस केली मिळून न आल्याने मुलीचा शोध नारायणवार पिपळा उटाकाटा म. प्र. अशा ठिकाणी घेतला असता आजपावेतो मिळुन आली नाही. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. नरखेड येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक फौजदार डोंगरदीवे पोस्टे नरखेड हे करीत आहे.