उमरेड :- अंतर्गत मौजा पांजरेपार शिवारात नांद नदीचा पात्र २५ किमी दक्षिण फिर्यादी व आरोपी हे नातेवाईक वहिनी व दिर असून एकाच घरात वेगवेगळे राहतात, यातील फिर्यादी यांच्या मुलीचे लग्न झाले असुन ती पाहुनचारासाठी गावाला आली असता, तेव्हा आरोपी यांच्या मुलीची गळ्यातील पोत कोणीतरी चोरली तेव्हा पासून आरोपी हि मृतक नामे संगीता विजय उमाटे वय ४० वर्ष रा. बिडबोथली ता. कुही हिला व तिच्या मुलीला टोमने मारू लागली. त्यामुळे फिर्यादीचे पत्नी हि नेहमी तनावात राहत होती त्यानंतर नातेवाईकानी मृतक हिच्यावर चोरीचा आरोप लावल्याने तिला तो आरोप सहन न झाल्याने तिने मात्र कारणावरून दिनांक २८.०७.२३ ते २९.०७.२३ चे ०८.३० वा दरम्यान, नदीत उडी मारून आत्महत्या केली.
सदर प्रकरणी फिर्यादी नामे विजय राजेराम उमाटे वय ४० वर्ष रा. पांजरेपार पो. बेसुर ता. भिवापुर यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. उमरेड येथे आरोपी नामे- कल्पना गजानन उमाटे, वय ४० रा. पांजरेपार पो. बेसुर ता. भिवापुर आरोपीविरुद्ध कलम ३०६ भादवी अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास नसपोनि सुचिता हे करीत आहे.