कत्तलीसाठी परराज्यात जनावरे विक्रीस नेणाऱ्या आरोपींविरुध्द कारवाई

• पोलीस स्टेशन आष्टी यांची मोठी कारवाई

आष्टी :-पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशाने अवैध व्यवसाय करणा-या व्यक्तींवर आष्टी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली असून त्याअनुषंगाने दिनांक २७/०७/२०२३ रोजी गोपनिय माहितीदाराकडुन माहिती प्राप्त झाली असता, ०४ आयसर व ०१ पिकअप वाहनामध्ये अवैधरित्या गोवंश जातीचे जनावरे दाटीवाटीने भरुन तेलंगाना राज्यात कत्तली करीता कोनसरी ते जैरामपुर मार्गे घेवून जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांना मिळाल्याने सदर माहीतीच्या अनुषंगाने आष्टी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कोनसरी ते जैरामपुर जंगल परिसरात नाकाबंदी करून ०४ आयसर व ०१ पिकअप वाहन ताब्यात घेतले. त्यावेळी त्यातील काही आरोपी जंगल परिसराचा फायदा घेवून पळून जाण्याचा प्रयत्न केले परंतु त्यांना ४ ते ५ कि. मी. पाठलाग करून पकडण्यात आले आहे.

सदर कारवाईत एकुण ५८,००,०००/- (अक्षरी अट्ठावन लाख रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये ०४ आयसर व ०१ पिकअप वाहन व त्यामध्ये एकुण १०४ गोवंश जातीचे जनावरे ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाईत १) शेख अब्दुल शेख बक्शु २) शेख मोबीन शेख ३) शेख आरीफ शेख नझीर ४) शेख आरीफ शेख बाबा ५) चंद्रशेखर गाधाम या आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यामधील ईतर ३ असे एकुण ८ आरोपीतांवर पोस्टे आष्टी येथे गुन्हा क्र. १८७ / २०२३ कलम ४२९, ३४ भादवी, सहकलम ५ (अ), (१), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९५५ (सुधारणा) तसेच सहकलम ३, ११ (ड) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० तसेच सहकलम ११९ महा. पोलिस अधिनियम १९५१ तसेच सहकलम १३० / १७७ मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा तपास पोउपनि अजय राठोड हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी पतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  कुंदन गावडे, पोउपनि अजय राठोड, गणेश जंगले, श्रेणी पोउपनि येनगंटीवार, सफी / देवतळे, पोहवा /४०७ मडावी, पोना / ३३१९ जाधव, पोना / ५१७७ सुरवाडे, पोशी/३३९५ नागुलवार, पोशी/ ५६६१ रावसिडाम, पोशी / ४१५४ पोतराजे, पोशी/ ५६७५ गेंदाळे यांनी पार पाडली आहे..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

यौमे आशूरा (मोहर्रम) पर आज विशाल ताजियों के साथ निकलेगा मातमी जुलूस

Sat Jul 29 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-हजरत मोहम्मद (स,अ,व) के नवासे हजरत ईमाम हुसैन (अ,स) और उनके 72 साथियों की कर्बला (ईराक) की धरती पर यादगार शहादत की याद में मनाया जाने वाला मोहर्रम का मुख्य जुलूस 29 जुलाई को ईमाम हुसैन और 72 साथियो की शहादत के दिन यौमे आशूरा के अवसर पर हुसैनाबाद इमाम बाड़ा हैदरी चौक से सुबह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!