कुंभारे कॉलनी परिसरात आरोही डिजीटल कॉन्व्हेंट चे थाटात उद्घाटन !

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- ग्रामविकास एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित व नवयुवक उच्च प्राथमिक शाळा गौतमनगर कामठी संलग्नित आरोही डिजीटल कॉन्व्‍हेंट (पूर्व प्राथमिक शिक्षण ) चे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष सिताराम रडके व आरोही पंकज रडके यांच्या शुभ हस्ते शुक्रवार 19 मे ला सायंकाळी सहा वाजता कुंभारे कॉलोनी येथील बोधी वाचनालय परिसरात करण्यांत आले . कार्यक्रमाला विशेष अतिथी दिक्षाभूमी चे विश्वस्त भन्ते नागदिपांकर महास्थविर ,संस्था उपाध्यक्ष आस्तिक सहारे पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी केवल दूर्गे, संस्था सचिव पंकज रडके , डॉ महेश महाजन, माजी नगरसेवक प्रतिक पडोळे, स्नेहलता गजभिये, अरुणा रायबोले, रुपचंद बागडे, गौतम माटे, शालीकराम अडकणे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी भैय्याराम रडके, सुभाष रडके, गजानन भोयर, शांताबाई रडके, अतुल ठाकरे, श्रीकृष्णा खेडेकर, विलास फरकाडे, अपर्णा रडके हे सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तथा प्रास्ताविक विजय नंदनवार तर आभार प्रदर्शन राजकुमार शेन्डे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकारिता मयुरी यादव, नाजुका मानवटकर, पूजा इंगोले, दिपाली आठवले रायबोले, जिवन झिंगरे यांनी परिश्रम घेतले.

NewsToday24x7

Next Post

आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या समस्या लागणार मार्गी - आमदार सुधाकर अडबाले

Mon May 22 , 2023
– आदिवासी विकास विभागात समस्या निवारणार्थ सहविचार सभा नागपूर :- आदिवासी विकास विभागातील कार्यरत अनुदानित व शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्‍या निवारणार्थ सहविचार सभा आमदार सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीत अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर येथे नुकतीच पार पडली. आदिवासी विभागातील सर्व समस्या व प्रलंबित प्रकरणे ३० जूनपर्यंत निकाली काढण्यात यावी, असे निर्देश सभेतील चर्चेदरम्यान आमदार सुधाकर अडबाले यांनी दिले. […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com