नागपूर :- पोलीस ठाणे नविन कामठी हद्दीत नागपूर जबलपूर रोडवर, कमसरी बाजार बस स्टॉप कामठी येथे एक अनोळखी इसम वय ३५ ते ४० वर्ष हे जात असतांना एका अज्ञात वाहन चलकाने आपले ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्या इसमास धडक देवून पळून गेला. अपघातामध्ये त्या अनोळखी इसमाचे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यास उपचारकामी उप जिला रूग्णालय कामठी येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषीत केले.
याप्रकरणी पोलीस ठाणे नविन कामठी येथील पोउपनि संजय आठवले ९९२३६१८००५ यांनी अज्ञात वाहन चालकाविरूध्द कलम ३०४(अ) २७९, भा.दं. सहकलम १३४, १७७, मो.वा.का. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे..