संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– विशेष इंद्रधनुष्य मोहिम कार्यशाळा
कामठी :- कामठी नगर परिषद अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नुकतेच वैद्यकीय अधिकारी डॉ. शबनम खाणुनी यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त आरोग्य कर्मचारी व आशा वर्करला मिशन इंद्रधनुष्य बाबत आढावा घेत मार्गदर्शन केले.तसेच घरोघरी सर्वेक्षणकरिता येणाऱ्या आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. शबनम खाणुनी यांनी केले आहे.
या मोहिमेत 17 ते 27 जुलै दरम्यान आरोग्य विभागातर्फे कर्मचाऱ्यातर्फे ,आशा स्वयंसेविकानी घरोघरी जाऊन बालकांचे लसीकरण बाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.ज्या बालकांचे वयोगटानुसार लसीकरण घ्यायला पाहिजे होते जर ती लस दिली नाही त्या बालकास विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेत सात ते बारा ऑगस्ट दरम्यान लसीकरण करण्यात येणार आहे. यामुळे बालकास लसीकरण पूर्ण देऊन सुरक्षित करण्यात येणार आहे बालकांना पोलिओ ,बीसीजी,,आयपीव्ही,रोटा पेंटा पी सी व्ही मिझल,रूबेला ,जीवनस्तव अ या लसीकरणाचे लसीकरण करण्यात येणार आहे.
तरी सर्वेक्षणकरिता येणाऱ्या आशा स्वयंसेविका व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे व बालका बद्दल लसीकरणाची माहिती द्यावी. व आपल्या बालकास मोहीम मध्ये लसीकरण करून घ्यावे तसेच हिवताप,डेंगीताप, चिकणगुणिया होऊ नये म्हणून आपण दर शनिवारी कोरडा दिवस पाळावा तसेच आपल्या घरातील कंटेनर,पाणीसाठ्याचे रांजण, गुंड,टाकी हाऊस हे दर आठवड्याला एका दिवशी पूर्ण रिकामी करावे म्हणजे त्यामध्ये डास अंडी घालणार नाहीत व डास उत्पत्ती थांबेल व साथरोग पसरणार नाही अशी सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन डॉ. शबनम खाणुनी यांनी केले आहे.