संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- शेतकऱ्यांच्या पाचवीला पूजलेल्या शेतीतील समस्या दूर करून वेळीच शेतीव्यवसाय तारण्याची गरज सलाम किसान या संस्थेने ओळखली आहे. सलाम किसान शेतकऱ्यांना पेरणी ते लागवडी पर्यंत डेटा ड्राइव्हन एन्ड टु एन्ड सोलुशन पुरवते व कमीतकमी दरात जास्त उत्पन्न देऊन शेती अधिक सुलभ बनवण्यास मदत करते. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाची जाणीव ठेवत सुमित ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली आधार संस्था नागपूर आणि WCL नागपूर यांच्या सहकार्याने आयोजित हायटेक स्टीलटेक्चर प्रोस्थेसिस कृत्रिम पाय वितरण सोहळा नागपूरात पार पडला.
सोहळ्यात शेतीतंत्रज्ञानाबद्दल जनजागृतीच्या हेतूने सलाम किसान ची टिम सुद्धा सहभागी झाली होती. या दरम्यान कार्यक्रमास लाभलेले उदघाटक व अनेकांचे प्रेरणास्रोत असणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सलाम किसान च्या स्टॉलवर प्रत्यक्ष्यात जाऊन भेट दिली असता कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय खोब्रागडे यांच्याशी परस्पर संवाद साधला. या चर्चे दरम्यान सलाम किसान ची डिजिटल कृषिप्रधान राष्ट्राची संकल्पना ऐकून लगेच त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय खोब्रागडे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतुक केले व सलाम किसान टिम ला उत्साही प्रोत्साहन दिले त्याचबरोबर सलाम किसान संस्थे मार्फत शेतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणारे उपक्रम भारताच्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात मदत करण्याची इच्छा ही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.