मुंबई :- “विद्यार्थ्यांना गणित सोपे करून सांगणाऱ्या ज्येष्ठ गणितज्ज्ञ तसेच लेखिका डॉ. मंगला जयंत नारळीकर यांच्या निधनाने आज महाराष्ट्राने विद्यार्थीप्रिय शिक्षिका गमावली आहे”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ‘‘ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना पत्नी आणि सहकारी म्हणून खंबीर साथ देतानाच मंगलाताईंनी आपले स्वतंत्र विश्व निर्माण केले होते. गणित सोपे करून सांगत विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी गणिताविषयी गोडी निर्माण केली. अनेक मराठी आणि इंग्रजी पुस्तके लिहून साहित्यविश्वातही भरीव योगदान दिले. ‘गणिताच्या सोप्या वाटा’, ‘नभात हसरे तारे’, ‘पाहिलेले देश’, ‘भेटलेली माणसं’ ह्या त्यांच्या साहित्यरचना आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहणारे आहे. नारळीकर कुटुंबीयांना हे दु:ख पचविण्याचे सामर्थ्य मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना व डॉ. मंगलाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.’’