संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी छावणी परिषद अंतर्गत येणाऱ्या पुराना गोदाम परिसरतील पाळीव गाय सकाळी घराजवळ फिरकत असता रस्त्यावरील एका विद्दूत खांबाजवळून जात असता या विद्दूत खांबाला स्पर्श होऊन विद्दूत धक्का लागून गाईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10 दरम्यान घडली असून यासंदर्भात मृतक पाळीव गाय मालक राजेंद्र पिल्ले यांनी स्थानिक छावणी परिषद प्रशासनाला माहिती देताच प्रशासनिक कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतक गाईला घेऊन गेले.यासंदर्भात पीडित राजेंद्र पिल्ले यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे तर विद्दूत खांबाला स्पर्श होऊन गाईचा मृत्यू झाल्याने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.