मुंबई :- माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली.राज्याचे पर्यटन,महिला व बालविकास, कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सोमनाथ बागूल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी चंद्रकांत काकडे,सामान्य प्रशासन विभागाचे सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, किरण देशपांडे व अन्य अधिकारी,कर्मचारी यांनीही वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com