– बोधीसत्व नागार्जुन बुध्द महोत्सव
नागपूर :- बोधीसत्व नागार्जुन आयुर्वेद आणि रसायनाचे जनक होते. नागार्जुन यांनी या टेकडीवर (नागार्जुन टेकडी व परिसर) आयुर्वेदासंबधी अनेक शोधकार्य केले. या टेकडीवर आजही आयुर्वेदीक वनोषधी आहेत. एतिहासिक टेकडीच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केली. अखिल भारतीय धम्मसेना तसेच भिक्खू आणि भिक्खूनी संघ यांच्या संयुक्त वतीने बोधीसत्व नागार्जुन महाविहार, रामटेक येथे आयोजित एक दिवसीय बोधीसत्व नागार्जुन बुध्द महोत्सवात ससाई बोलत होते. यावेळी बुध्द भीम गीते सादर करण्यात आली.
महोत्सवात नागपूरसह विदर्भातील उपासक उपासिका पांढरे वस्त्र परिधान करून सहभागी झाल्या होत्या. पंचशील ध्वज लक्षवेधी ठरले. हजारो बांधवांची वर्दळ असल्याने पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता. प्रारंभी ससाई आणि भिक्खू संघाने परित्राण पाठ घेतला. यानंतर नागार्जुनाचा प्राचिन इतिहासाची माहिती दिली. उपस्थित भंतेनी प्रवचन दिले. यावेळी बुध्द भीत गीते सादर करण्यात आली. एकापेक्षा एक सरस अशा गीतांनी उपासकांना उर्जा मिळाली. दिवसभर चाललेल्या महोत्सवात विदर्भाच्या कानाकोपर्यातून आणि प्रत्येक विहारातून हजारो बांधव आपल्या चिमुकल्यांसह आले होते. उपासकांना भोजनदान देण्यात आले.
या प्रसंगी भंते नागसेन, भंते महानाग, भंते मिलिंद, भंते प्रज्ञाबोधी, भंते धम्मबोधी, भंते धम्मविजय, भंते धम्मबोधी, भंते विनया शील, भंते धम्मशील, भंते राहुल, भंते अश्वजित, भंते धम्मविजय, भंते मिलिंद, भंते नागवंश, भंते धम्मसारथी, भिक्खूनी धम्मसुधा, भिक्खूनी विशाखा, भिक्खूनी पारमीता, भिक्खूनी संघमित्रा, संघप्रीया, भिक्ख्ाूनी किसागौतमी, भिक्खूनी पुनीका, भिक्ख्ाूनी धम्मशीला, भिक्खूनी धम्मप्रीया यांच्यासह भिक्खू संघ, भिक्खूनी संघ, अखिल भारतीय धम्म सेना, भारतीय बौध्द महासभा, आंबेडकरी अनुयायी, उपासक, उपासिका हजारोच्या संख्येनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भंते राहूल, रवी मेंढे यांच्यासह धम्मसेनेच्या पदाधिकार्यांनी सहकार्य केले.