संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-पुस्तकातच वह्यांची पाने,30 जून पासून शाळांना होणार सुरुवात
कामठी :– पहिली ते आठवी पर्यंतची पुस्तके एकात्मिक पद्धतीने चार भागात पथदर्शी स्वरूपात प्रकाशित करण्यात आली आहेत.पुस्तकात नोंदीसाठी वह्यांची पाने जोडण्यात आली आहेत.महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने पुस्तकातील वह्यांच्या पानांच्या प्रभावी वापराबाबतच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
शासन निर्णयानुसार पाठयपुस्तकामध्ये वह्यांच्या पानांचा समावेश केला असून ही पाने माझी नोंद या शिर्षकाखाली देण्यात आली आहे.पुस्तकातील वह्यांचा पानाचा वापर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या माझी नोंद यामधील नोंदी समान असण्याचा आग्रह धरू नये.विद्यार्थ्यांनी तारीखावर नोंदी कराव्यात. वर्गामधील चर्चेदरम्यान उपस्थित झालेले मुद्दे लिहून ठेवन्यासाठी ,महत्वाचे मुद्दे नोंदवुन घेण्यासाठी ,वर्गात सुचवलेले अधिकचे प्रश्न नोंदवण्यासाठी काही संदर्भ वर्तमानपत्रात विषयाच्या अनुषंगाने आलेली विविध प्रकारची माहिती व साहित्याची नोंद घेणे पाठयपुस्तकाबाहेरील परंतु आशयाला पूरक माहितीची नोंद घेणे,अध्यापन,अध्ययन प्रक्रिये दरम्यान उपस्थित झालेले प्रश्न लिहिणे,चित्राकृती,चित्रालेख ,आकृत्या काढण्यासाठी ,पाठाला पूरक मुद्दे लिहून घेण्यासाठी गृहकार्य लिहून घेण्यासाठी ,अध्ययन करताना आलेल्या शंका लिहुन घेण्यासाठी पानांचा वापर करता येणार आहे तसेच शिक्षकांनी दिलेली उदाहरणे विद्यार्थ्यांना माझी नोंद यामध्ये नोंदवता येणार आहेत.त्यांचे स्वतःचे सुलभ संदर्भ साहित्य तयार होणार आहे स्वतःचे मुद्दे विद्यार्थ्यांना काढता येतील.आशयानुसार दिलेल्या विशेष नोंदी करता येतील.अवांत वाचनातून तयार झालेल्या महत्वाच्या नोंदी घेता येणार आहेत.एकाच पाठयपुस्तकात सर्व विषय असल्याने विषयामधील सहसंबंध शोधणे सुलभ होईल.
-विद्यार्थ्यांच्या दफ्तरांचे ओझे होणार कमी
—विद्यार्थ्यांना एकच पाठयपुस्तक शाळेत न्यावे लागेल त्यामुळे दफ्तरांचे ओझे कमी होण्यास मदत होणार आहे. पाठ्ययपुस्तकांचे. स्वयंअध्ययन करताना या नोंदीचा वापर विद्यार्थ्यांना करता येणार आहे.नोंदीचा वापर त्याला स्वयंअध्ययनासाठी करता येईल.विद्यार्थ्यांना स्वतःच्या शब्दामध्ये स्वतःच्या नोंदी करता येतील व ही सवय त्यांच्या अंगवळणी पडणार आहे.