कन्हान :- नागपूर ग्रामीण येथील पोलीस स्टाफ दिनांक १४/०६/२०२३ मे ०५.१५ वा. ते ०६. ०० वा. दरम्यान कन्हान उपविभागात धंद्यावर आळा घालणेकामी पोस्टे कन्हान हद्दीत पेट्रोलींग करीत असता खात्रीशिर माहिती मिळाली की, सिंगारदिप गावातील कन्हान नदीच्या पात्रात ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहाय्याने अवैधरित्या विनापरवाना रेती ची चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून सिंगारदिप गावातील कन्हान नदीच्या पात्रातून आरोपीतांनी दोन ट्रॅक्टर मध्ये ट्रॉली सह एक ब्रास रेती किंमत २२००/- १) एक निळ्या रंगाचा सोनालिका सिकंदर कंपनीचा MH40 CA 6670 असलेला मुंडा ५,००,०००/- रु. २) ट्रॅक्टरला लागून असलेली हिरव्या रंगाची ट्राली ३) ट्रॉली मधील एक ब्रास रेती ५) घमेले रेती भरलेली ७) दोन शेंदरी रंगाने प्लास्टीक घमेले ८) दोन प्लास्टीकचे दांडे असलेले लोखंडी फावडे प्रत्येकी १५०/- रु. असा एकूण १२,०२,९०० /- रुपयाचा मुद्देमाल आरोपीतांच्या ताब्यातून जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे पोशि/ अश्विन गजभिये व नं. ७९८ यांच्या रिपोर्टवरू कन्हान येथे आरोपीताविरुध्द कलम ३७९ ३४ भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे… एएसआय गणेश पाल हे करीत आहे.