संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दिव्यांग फाऊंडेशन व ग्रामपंचायत रनाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 12 जुन ला दिव्यांग फॉउंडेशन च्या अथक प्रयत्नाने अपगं लाभार्थी यांना पाच इलेक्ट्रॉनिक (तिन चाकी) सायकल वाटप करण्यात आली. लाभार्थीत कंचन नानेट, राजू राऊत, रेजींना लकडा, अंकुश वासनिक, प्रमोद पांडे ह्या लाभार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या याप्रसंगी रनाळा ग्रा प सरपंच पंकज साबळे, ग्रामपंचायत सदस्य व दिव्यांग अध्यक्ष प्रदीप (बाल्या)सपाटे, ग्रामपंचायत सदस्य इंदू सिद्धार्थ पाटील, स्वप्नील फुकटे,अमीर खान सुनीता नांदेश्वर, अस्मिता भोयर, दिव्यागं फाऊंडेशन चे सचिव बॉबी महेंद्र,अजय सिंग ठाकूर,अमोल नागपुरे,पवन वांडरे गणेश सपाटे आदि उपस्थित होते.