नागपूर :-दिनांक ०९.०६.२०२३ चे १८.०० वा. चे सुमारास पोलीस ठाणे नंदनवन हदीत पेट्रोलींग दरम्यान गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदाराकडुन मिळवलेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन गल्ली नं. १, भाग्यश्री नगर तेवीसकरचे घरी किरायाने राहणारा कुणाल नामदेवराव कुंभारे वय २६ वर्ष याची अंगझडती घेतली असता त्याचे फुल पॅन्टचे मागील बाजुस कमरेत खोचलेले एक विदेशी बनावटीचे पिस्टल सारखे aritra मॅगझीन असलेले किमती ५०,०००/- रू मिळुन आले ते जप्त करून त्यास सखोल विचारपूस केली असता नमुद अग्नीशस्त्र त्याने मनोज गुलाबराव बावने वय २६ वर्ष रा. शिवणकर नगर एलॉट न. २२१ खरबी रोड याचे कडुन घेतल्याचे सांगीतले. त्याला त्याचे घरा समोरून ताब्यात घेण्यात आले. त्याने नमुद अग्नीशस्त्र कुणाल कुंभारे याला दिल्याचे कबुल केले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचे विरुद्ध पोलीस ठाणे नंदनवन येथे कलम ३/२५ भा.. सहकलम १३५ म.पो.का अन्वये गुन्हा नोदवुन आरोपींना अग्नीशस्यासह नंदनवन पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) मुम्मका सुदर्शन, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोनि महेश सागडे, सपोनी, पवन मोरे, पोउपनि मधुकर कोठाके, पोहवा. दशरथ मिश्रा, मुकेश राउत, आनंद काळे, पोअ. जितेश रेडी, शेख फिरोज, रविन्द्र करदाते यांनी केली..