संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-धोकादायक जीर्ण इमारतीकडे दुर्लक्ष: केवळ नोटीस बजावण्याचेच सोपस्कार,
….तर मुंबईच्या घटनेची पुनरावृत्तीला वेळ लागणार नाही,
-शहरातील जीर्ण इमारती केव्हा पाडणार
कामठी :- पावसाळ्यात जुन्या झालेल्या जीर्ण इमारती पडून जीवितहानी होण्याच्या घटना ह्या काही नव्या राहिलेल्या नाहीत 2019 मध्ये-पावसामुळे मुंबईतील मालाड येथे जीर्ण इमारत कोसळून 8 ते 10 जणांना जीव गमवावा लागल्याची घटना घडली होती तसेच पुण्यातील कोडवा येथे संरक्षक भिंत कोसळून जवळपास 40 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने जीर्ण इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आला होता .कामठी शहरात सुद्धा अश्या काही जीर्ण इमारती असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता,नाकारता येत नाही . त्यामुळे वेळीच यावर उपाय योजना केली नाही तर कामठी शहरातही मुंबईच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतेच 2 मे ला अवकाळी पावसामुळे दुर्गा चौकातील कामठी नगर परिषद ची कित्येक वर्षे जुनी असलेल्या चाळितील एका दारू दुकानाचे समोरील छत कोसळले होते दरम्यान अवकाळी पाऊस सुरू असल्याने ये जा बंद असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी या चाळीतील कित्येक दुकाने हे जीर्णावस्थेत आहेत त्यामुळे कामठी नगर परिषद बळींची प्रतीक्षा तर करत नाही ना? या चर्चेला शहरात उधाण आहे.
कामठी शहरात काही जुन्या जीर्ण इमारती असून त्या कधीही कोसळतील अशी परिस्थिती आहे. या इमारतीत पावसाळ्यातील पाणी भिंतीत, छतात मुरून इमारती कोसळू शकतात ज्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
नगर परिषद च्या विभाग नोहाय पथक ने जीर्ण इमारतींची माहिती संकलित करून मागच्या वर्षी याजीर्ण इमारती मालकांना नोटीस बजावल्या होत्या तरीसुद्धा या इमारती मालकांनी या धोकादायक इमारती पाडल्या नसल्याने धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता,नाकारता येत नाही याकडे नगर परिषद ने लक्ष देणे गरजेचे आहे.नगर रचना विभागाने संबंधित जीर्ण इमारती मालमत्ता धारकांना नोटीस बजावून त्यांना जीर्ण इमारत पाडण्यास सांगण्यात यावे तसेच लवकरच पावसाळा ऋतू लागत आहे तरी इमारती पाडण्यात आलेले नाही अशा परिस्थितीत त्यांच्याकडून इमारत न पाडल्यास नगर परिषद ती जीर्ण इमारत पाडू शकते अशी अधिनियमात तरतूद आहे तेव्हा नगर परोषद ने या परिस्थिती कडे दुर्लक्ष केल्यास मुंबईत व पुण्यात घडलेल्या घटनेच्या पुनरावृत्तीला वेळ लागणार नाही…..