लेहमध्ये पूर्व परिषद आयोजित करू नये, अशी विधाने करून अनेकांनी त्याबाबत संभ्रम निर्माण करूनही वाय 20 पूर्व परिषद यशस्वीरित्या पार पडली : अनुराग सिंह ठाकूर
नवी दिल्ली :- लेहमध्ये आयोजित वाय 20 पूर्व परिषदेचा आज यशस्वीपणे समारोप झाला. ही पूर्व परिषद 26 ते 28 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
भारताच्या अध्यक्षतेखालील जी 20 ने नवे टप्पे प्रस्थापित केले आहेत, असे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी समारोपाच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले. चर्चा आणि विचारविनिमय यशस्वीपणे सुरू आहेत आणि भारताच्या समृद्ध कला, संस्कृती आणि वारशाने जगभरातील प्रतिनिधींवर चिरस्वरूपी छाप उमटवली आहे, असे ते म्हणाले. लेहमधील वाय 20 पूर्व परिषदेमध्ये सहभागी झालेले सुमारे 103 प्रतिनिधी लेहमधील विहार , संगम आणि निसर्ग सौंदर्य पाहून मंत्रमुग्ध झाले आहेत आणि त्यांची लदाखला पुन्हा येण्याची इच्छा आहे, असेही ठाकूर यांनी सांगितले.
पूर्व परिषद लेहमध्ये आयोजित करू नये अशी अनेकांनी विधाने करून आणि त्याबाबत संभ्रम निर्माण करूनही वाय 20 पूर्व परिषद यशस्वीपणे पार पडली, असे त्यांनी सांगितले.
लेहमधील पूर्व परिषदेचे फलित म्हणजे, सहभागी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये वाय 20 शिखर परिषदेच्या पाच विषयांवर एकमत झाले आहे.रीस्किलिंग म्हणजेच कौशल्याच्या कक्षा रुंदावणे आणि अपस्किलिंग म्हणजे कौशल्याला आधुनिकतेची जोड देणे यासह भविष्यातील आव्हानांवर महत्त्वाच्या सूचना या पूर्व परिषदेतून आल्याची माहितीही त्यांनी दिली.
लोकशाही आणि प्रशासनातील तरुण; कामाचे भविष्य: उद्योग 4.0, नवोन्मेष आणि 21 व्या शतकातील कौशल्ये; हवामान बदल आणि आपत्ती जोखीम कमी करणे: शाश्वततेला जीवन जगण्याचा एक मार्ग बनवणे; शांतता निर्माण आणि सलोखा: युद्ध नसलेल्या युगाची सुरुवात आणि आरोग्य, कल्याण आणि क्रीडा: तरुणांसाठी अजेंडा या सामायिक भविष्याच्या पाच वाय 20 विषयांवर या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले
यापूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी प्रतिनिधींसोबत युवा संवाद आयोजित केला होता. जागतिक प्रभाव पाडण्याचे ध्येय आता तरुणांकडे आहे, अर्थव्यवस्था असो वा शिक्षण, क्रीडा असो वा उद्यमशीलता , कौशल्य विकास असो वा डिजिटलीकरण असो, झेप घेण्यासाठी तरुणाईसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
वाय 20 शिखर परिषद तरुणांना आणि जगाला त्यांच्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चर्चांना आकार देण्याची आणि आपल्या संबंधित प्रदेशांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी अनेक प्रकारे सक्रिय होण्याची एक अनोखी संधी प्रदान करत आहे, असे त्यांनी सांगितले. आशावाद आणि संधी एकत्र येण्याची ही एक ऐतिहासिक वेळ आहे ! युवा 20 सारख्या मंचावर भविष्यातील आघाडी तयार होत आहे., असे ठाकूर म्हणाले. त्यांनी तरुणाईला नव्या कल्पना मांडण्याचे , नवीन संबंध विकसित करण्याचे आणि बदल घडवण्याचे आवाहन केले. बदल हा एकमात्र निरंतर राहणार आहे , त्यामुळे तुम्ही आपला आलेख उंचावत बदलाची अपेक्षा करा आणि तो घडवा , असे ते म्हणाले.
ते असेही म्हणाले की आपण मानवी इतिहासातील सर्वात महान युगात रहात आहोत, तुम्हाला माहित आहे की तुम्हाला असे जग वारशाने मिळाले आहे जे तुमच्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक सुखसोयी, संधी, संरचना, व्यवस्था यांनी सुसज्ज आहे आणि ज्यामुळे तुम्ही आणि तुमच्या सभोवतालात पूर्वीपेक्षा काहीतरी उत्तम घडवू शकाल.
त्यांनी पुढे टिप्पणी केली, “मला विश्वास आहे की तरुण पिढी गेल्या शतकापेक्षा प्रगती करेल जी या नवीन (युवा) पिढीने शोधून काढलेल्या महत्वपूर्ण टप्प्यांच्या तुलनेत थिटी वाटेल.”
ते म्हणाले की, तरुणांना हे समजले पाहिजे की तुम्ही जगण्याच्या सर्वात महान कालखंडात रहात आहात असे सांगून त्यांना स्वप्न पाहण्यासाठी, वाचन करण्यासाठी, लिखाणासाठी, विचार करण्यासाठी आणि निर्भयपणे वागण्यासाठी प्रोत्साहन दिले!
ते असेही म्हणाले की वाय 20 संकल्पना तरुणांना जी 20 च्या विकासाचा अजेंडा आणि संपूर्ण जागतिक समुदाय तयार करण्यासाठी, सहयोग करण्यासाठी आणि योगदान देण्यासाठी सक्षम करायला काळजीपूर्वक निवडल्या गेल्या आहेत.
आमचा ठाम विश्वास आहे की, या दशकाच्या शेवटी, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा लक्षणीय विकास झाला असेल आणि डेटा सायन्सने आपल्या जीवनाचा बहुतांश भाग व्यापला असेल.
या कौशल्यांनी तरुणांनी सुसज्ज व्हायला हवे.
त्यांनी आवाहन केले की, तरुणांनी भूतकाळातील अडथळ्यांवर मात करून भविष्यात आपल्या देशांच्या क्षमतांचा धांडोळा घेण्यासाठी वर्तमानातील संधींचा लाभ घ्यावा!
त्यांनी तरुणांना पूर्वग्रह, पूर्वकल्पना आणि भूतकाळातील द्विध्रुवीय जागतिक दृष्टिकोनात अडकू नये असे सांगितले.
युवा संवाद येथे अनुराग सिंह ठाकूर यांनी सहभागी देशांतील प्रतिनिधींशी संवाद साधला आणि युवक, स्टार्ट अप्स, महिला, कौशल्य विकास, शिक्षण यासह विविध विषयांवर चर्चा केली.
संध्याकाळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी समारोप सोहोळ्यात भाग घेतला जेथे स्वातंत्र्याच्या अमृत कथांवरील दोन छोटे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आले. यावेळी मोदी@20 पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. लेह-लडाखचे नायब राज्यपाल गव्हर्नर ब्रिगेडियर (डॉ.) बी.डी. मिश्रा (निवृत्त), मुख्य कार्यकारी काऊन्सेलर ताशी ग्याल्सन, आणि लडाखचे खासदार जम्यांग त्सेरिंग नामग्याल यावेळी उपस्थित होते.