संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेऊन त्यास मंजुरी देण्यात आली ज्यामुळे सफाई कामगारांच्या कुटुंबांना नोकरी मिळणे सहज झाल्याने लाड समितीच्या शिफारशी लागू केल्याबद्दल या निर्णयाचे स्वागत करीत राज्य शासनासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानत असल्याचे मत माजी नगरसेवक कपिल गायधने यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातुन व्यक्त केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याबाबत निर्णय घेतला आहे. यासंदर्भात वारसा हक्कांबाबत पूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करून एकत्रित नवीन शासन निर्णय काढण्यात आला आहे. यानुसार एखाद्या कामगारांचे पद काहीही असले आणि त्याला सफाईशी संबंधित काम दिले जात असेल तर त्यांनाही सफाई कामगार संबोधून सर्व लाभ देण्यात येतील. डोक्यावरून मैला वाहण्याचे काम केलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरीत प्राधान्य दिले जाईल.वारसा हक्कांसाठी सुधारीत तरतुदी केल्यामुळे हजारो सफाई कामगारांच्या कुटुंबियांची अनेक वर्षाची मागणी मान्य झाली आहे .
तसेच शौचालय स्वछता,घाणीशी संबंधित मलनिस्सारण व्यवस्था, नाली गटारे,ड्रेनेज तसेच रुग्णालय आणि शवविच्छेदन गृहातील घाणीशी संबंधित ठिकाणचे सफाईचे काम करणारे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्ग तसेच सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणारे सर्व कामगार आणि पूर्वी डोक्यावरून मैला वाहून नेण्याचे काम केलेल्यांच्या वारसांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्यात येईल ,मात्र रोजंदारी, कंत्राटी तत्वावर बाह्य स्रोताद्वारे हे काम करणाऱ्या व्यक्तींना लाभ मिळणार नाही .ज्या सफाई कामगारांच्या सेवा नियमित झाल्या आहेत त्यांना या शिफारशींचा लाभ मिळणार आहे.
सफाई कामगारांची पदोन्नती झाली तरी वारसा हक्काच्या नियमास बाधा येणार नाही ,सफाई कर्मचाऱ्यांस वर्ग 3 मध्ये पदोन्नती मिळाल्यास बिंदूनामावली प्रमाणे त्याला पदोन्नती द्यावी लागेल मात्र सफाई कामगार सेवेत असताना त्याला सेवेत गट क मध्ये पदोन्नती मिळाल्यास अशा कामगारांच्या वारसास वारसा हक्काची तरतूद लागू होणार नाही .ज्येष्ठता यादीतील सफाई कामगारांच्या वारसांची शैक्षणिक अहर्ता विचारात घेऊन वर्ग 3 किंवा वर्ग 4 मध्ये नेमणूक करण्यात येईल.या पदावर नियुक्ती देण्यासाठी टंकलेखन व एमएससीआयटी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात येईल.
-पती किंवा पत्नी,मुलगा किंवा मुलगी ,सून किंवा जावई,विधवा मुलगी,बहीण,घटस्फोटित मुलगी किंवा बहीण न,परितक्ता मुलगी किंवा बहिण ,अविवाहित संज्ञान मुलगी किंवा अविवाहित संज्ञान बहीण, अविवाहित सफाई कर्मचाऱ्याचा सक्खा भाऊ किंवा सकखी बहिण नात किंवा नातू यापैकी कोणीही वारस नसल्यास किंवा या वारसा पैकी कोणीही सफाईचे काम करण्यास तयार नसल्यास त्या सफाई कामगारांच्या हयात सांभाळ करण्याची लेखी शपथ पत्राद्वारे हमी देणारी व्यक्ती यांना वारसा हक्काने नोकरीसाठी पात्र समजले जाईल .अशांचे वय किमान 18 ते 45 वर्षे असावे.सफाई कामगारांच्या स्वेच्छानिवृत्तीसाठी किमान 15 वर्षे सेवा करणे बंधनकारक राहील तर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ति देण्यात येईल व त्यात टाळाटाळ व दिरंगाई होत असेल तर शासकीय निमशासकीय कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संबंधितांविरुद्ध तत्काळ शिस्तभंगाची करण्यात येईल.