संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– पंचायत समिति कामठी अंतर्गत विशेष अभियान
कामठी :- आज .१६ एप्रिल२०२४ ला स्वीप अंतर्गत पंचायत समिती कामठी अंतर्गत महानिर्मिती कोराडी औष्णिक विद्युत केंद्र येथे मागील निवडणुकीत या क्षेत्रात ५० %पेक्षा कमी मतदान झाल्याने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी “अधिकार है”महागीत सादर केले.तसेच सौम्या शर्मा यांनी १००% मतदान करण्याचे आव्हान कोराडी क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी रहिवासी यांना केले.याप्रसंगी कोराडी विद्युत केंद्रातील २०० अधिकारी यांच्या उपस्थितित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कोराडीतील सर्व कर्मचारी तसेच महिला कर्मचारी या परिसरातील सर्व मतदारांना मतदान करण्याचे आव्हान केले.याप्रसंगी सौम्या शर्मा,जिल्हा नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.नागपुर विलास मोटघरे,मुख्य अभियंता,कोराडी टिपीएस. प्रदिप गायगोले,गट विकास अधिकारी तथा नोडल अधिकारी.राहुल सोहनी,उप मुख्य अभियंता,शेलेंद्र कासुलकर,उप मुख् अभियंता,कोराडी टीपीएस संगिता तभाने,गटशिक्षणाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी ,प्रविण बुटे,डेप्युटी ई.ई.यांच्या समन्वयाने व प्रविण गावंडे विस्तार अधिकारी (पंचायत),अक्षय मंगरुळकर,कनिष्ट प्रशासन अधिकारी,रवि नन्होरे,अतुल आदे यांच्या सहकार्याने उपक्रम घेण्यात आले.मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली सर्वांचा उत्स्फुर्त सहभाग होता.कोराडी औष्णिक विद्युत विहार येथिल सर्व अधिक्षक अभियंते व विभाग प्रमुख ,अधिकारी कर्मचारी तसेच संघटना प्रतिनिधी व कंत्राटी कामगार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.