नागपूर :-‘फंक्शनल फूड्स आणि न्यूट्रास्युटिकल्सची ओळख’ या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते मंगळवार दिनांंक१४ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले.
या पुस्तकामध्ये ‘इंट्रोडक्शन टू फंक्शनल फूड्स अँड न्युट्रास्युटिकल्स’ याबाबत विस्तृत माहिती चे लिखाण करण्यात आले आहे. डॉ. रेखा शर्मा ह्या या पुस्तकाच्या संपादक आहेत आणि फार्मामेड प्रेस, बीएसपी बुक्स, हैदराबाद हे प्रकाशक आहेत. डॉ. सबीहा वाली, गृहविज्ञान पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या माजी प्रमुख व प्राध्यापिका डॉ. रेणुका मांदे, डॉ. शक्ती शर्मा, डॉ. प्रीती धार्मिक आणि डॉ. श्रीलक्ष्मी पोतलुरी या वेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी डॉ.सी.जी.देठे, संचालक, यूजीसी- मानव संसाधन विकास केंद्र आणि डॉ.कसबेकर प्रामुख्याने उपस्थित होते.