संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे युथ कार्निवल अर्थात सांस्कृतिक व अभ्यासपूरक कार्यक्रमाचे दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी थाटात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रविंद्र हरदास, प्राचार्य फाईन आर्ट महाविद्यालय एम. पी. देव नागपूर हे प्रामुख्याने उपस्थित होते. तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण हे विचारपीठावर उपस्थित होते. सोबतच महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. रेणू तिवारी, उपप्राचार्य डॉ. मनिष चक्रवर्ती, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. इफ्तेखार हुसैन आणि डॉ. तुषार चौधरी हेही मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये डॉ. इत्तेखार हुसैन यांनी महाविद्यालयात चालणाऱ्या 14 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंतच्या कार्यक्रमाची माहिती सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. त्यात रांगोळी स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, कवी संमेलन व मुशायरा स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा, नाट्य स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, आनंद मेला व हस्तकला प्रदर्शनी स्पर्धा , इत्यादी स्पर्धांची माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रवींद्र हरदास यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की, आपल्याला ज्या गोष्टींमध्ये आवड आहे त्या गोष्टीमध्ये आपण रस घेऊन वाटचाल केली पाहिजे. विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे ते क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात प्राण ओतुन आपले करिअर करावे अश्या शुभेच्छा सुध्दा या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की, कलाही माणसाचे आयुष्य घडवित असते. आणि त्या कलेमधून आपल्याला आनंद सुद्धा मिळत असतो. त्या कलेमुळे इतरांना आनंदी कसे ठेवता येतील याचे कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करून तशी कला आपल्या अंतरंगात वृद्धिगत करावी असे सांगितले . आणि या युथ कार्निवल कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी बऱ्याच गोष्टी शिकल्या पाहिजे असा संदेश दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा चौधरी आणि प्रांजल साखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन तपन गणवीर यांनी मानले. रांगोळी स्पर्धेच्या संयोजिका डॉ. आशा रामटेके आणि त्याची समिती यांनी सुंदर आयोजन करून रांगोळी स्पर्धा यशस्वी करून दाखवली. सोबतच पोस्टर स्पर्धेमध्ये सुद्धा पोस्टर स्पर्धेच्या संयोजिका डॉ. रश्मी जाचक आणि त्यांची समिती यांनी सुद्धा विविध प्रकारचे पोस्टर विद्यार्थ्याकडून करून घेऊन पोस्टर स्पर्धा यशस्वी करून दाखवली. सोबतच मेहंदी स्पर्धेच्या संयोजिका डॉ. दुर्गा पांडे आणि त्यांची समिती यांनी सुद्धा मेहंदी स्पर्धेचे आयोजन यशस्वीरित्या केले. सामान्य ज्ञान स्पर्धेचे संयोजक डॉ. तारुण्य मुलतानी यांनी सुद्धा सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून ही स्पर्धा सुद्धा यशस्वी करून दाखवली आणि नंतर प्रश्नमंजुषेच्या संयोजिका डॉ. जयश्री ठवरे आणि त्यांची समिती यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून ही स्पर्धा चांगल्या प्रकारे यशस्वी करून दाखवली. अशाप्रकारे महाविद्यालयात आयोजित केलेल्या या विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता. शिस्तपरिशिलन समितीचे समन्वयक डॉ. नितीन मेश्राम यांनी अतिशय उत्कृष्टपणे सर्व विद्यार्थ्यांना शिस्तीत ठेवले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी डॉ. इंद्राणी साहा, डॉ. रागिणी चाहांदे, डॉ. हाशमी, डॉ. इंद्रजित बसू, डॉ. राजेश पराते, डॉ. निशिता अंबाडे यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांचा सुद्धा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभला होता.