नागपूर : दिनांक 08 फेब्रुवारी 2023 रोजी भाट समाज आरक्षण संदर्भात महत्वाची बैठक मंत्री अतुल सावे, सहकार व इतर मागसवर्गीय मंत्री यांचे दालनात आ.कृष्णा खोपडे व समाजाचे शिष्टमंडळ यांच्या उपस्थितीत पार पडली.
तत्पूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भाट समाज, नागपुर कार्यकारिणी तर्फे आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार मंत्री अतुल सावे यांनी तात्काळ बैठक लावण्यात आली. त्यात संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा बोलावण्यात आले होते.
समाजाच्या शिष्टमंडळाने बैठकीत सांगितले कि, महाराष्ट्र शासनाने त्यांचा शासन निर्णय दि.11/03/1997 अनुसार दिलेल्या निर्देशानुसार जानेवारी 1999 मध्ये शासनाला सादर केलेल्या अहवालात मा.ईदाते यांच्या समितीने अहवालातील परिशिष्ट 2 च्या, पृष्ठ क्रं. 67 वर सन 1950 मधील अंत्रोळीकर या समितीच्या यादीतील विमुक्त भटक्या जातीच्या एकूण 28 विम्नुक्त भटक्या जमातीशिवाय एकूण 16 जाती वगळून शिल्लक 29 पैकी 13 जातींचा स्पष्ट उल्लेख केला. त्यात क्रमांक 6 वर भाट जातीचा उल्लेख असल्याचे स्पष्ट नमूद आहे. यावरून असे स्पष्ट दिसून येते कि, भाट ही मूळ जात कंजार, छारा, नाट ही उपजात आहे. वंशावळी लिखाण हे भाट समाजाचे प्रमुख कार्य असून त्या करिता ते सतत भटकत राहतात. त्यामुळे या समाजाचा भटक्या जमाती/विमुक्त जातीमध्ये समावेश करावा, अशी समाजाची मागणी आहे.
मंत्री अतुल सावे, यांनी समाजाचे संपूर्ण म्हणणे एकूण घेतले व सर्व बाबी जाणून घेतल्या. समाजाचे शिष्टमंडळाने अनेक पुरावे सादर केले.
मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना तीन महिन्यांच्या आत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. आपल्या समाजाला सकारात्मक प्रतिसाद दिला व सतत पाठपुरावा करून बैठकीत स्वतः जातीने हजर राहिल, त्यामुळे आमदार कृष्णा खोपडे यांचे आभार समाजाने मानले.
बैठकीत भाट समाजाच्या वतीने,
1) विनायकराव सुर्यवंशी अध्यक्ष अखिल महाराष्ट्र भाट समाज
2) सुनिल सुधाकरराव सुर्यवंशी सचिव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भाट समाज,
3) विनोद केशवराव दशमुखे सहसचिव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भाट समाज,नागपूर,
4) दिपकदादा साळवी राष्ट्रीय सचिव तथा राज्य संघटक अखिल महाराष्ट्र भाट समाज,
5) देवेंद्र मेहर, माजी नगरसेवक
मंत्री महोदयासहित महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने
1) आशाराणी पाटील, सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग पुणे,
2) मंत्रालय अप्पर सचिव इत्यादी मान्यवर या सुनावणीस हजर होते.
एकंदरीत बैठक सकारात्मक पार पडली.