ओबीसींच्या लढ्याला यश,…अखेर वसतिगृह विद्यार्थ्याकरींता सुरू झाले

गोंदिया :- वर्षानुवर्षांपासून ओबीसी वसतिगृहाची मागणी ओबीसी संघटनांकडून केली जात होती.याकरिता अनेकदा मोर्चे काढण्यात आले.आंदोलने करण्यात आली.भीख मांगो आंदोलनही करण्यात आले.मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापर्यंत सर्वांशीच यावर सवांद साधण्यात आले.आणि अखेर ओबीसींच्या लढ्याला यश आले असून,आज बुधवारी (दि.९) नागपुरात राज्यातील ४४ ओबीसी मुलामुलींच्या वसतिगृहांचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.नागपूर येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर प्रमुख अतिथी म्हणून इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे,आमदार डॉ. परिणय फुके हे दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत गोंदिया येथे २०२४-२५ या शैक्षणिक सत्रापासून सुरू होणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील पदवी शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या व मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.

गोंदियातील आयोजित कार्यक्रमाला आमदार विनोद अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम.,इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विनोद मोहतुरे,ओबीसी अधिकार मंचचे संयोजक खेमेंद्र कटरे,ओबीसी आघाडी भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र फुंडे,राजेश बिसेन मंचावर उपस्थित होते. सदर कार्यक्रम विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मुलींचे शासकीय वसतिगृह, संकल्प चौक, गणेशनगर, गोंदिया येथे पार पडला.

जिल्ह्यात इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी दोन शासकीय वसतिगृह कार्यान्वित झाल्यामुळे याचा विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होणार आहे, असे मत आमदार विनोद अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी संघटनानी केलेल्या मागणीला यश आले असून ओबीसी योध्दांच्या कार्याचा गौरव करीत राज्यसरकार पुढेही ओबीसींच्या मुलांच्या हिताकरीता निर्णय घेत राहील असे विचार व्यक्त केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी वसतिगृहाचे आज भाड्याच्या इमारतीत उदघाटन होत असले तरी भविष्यात लवकरच स्वतःच्या मालकीच्या जागेत हे शासकीय वसतिगृह बघावयास मिळेल असे सांगत वसतिगृहाचा वापर विद्यार्थी विद्यार्थींनी योग्यरित्या करुन अभ्यासाच्या माध्यमातून नावलौकीक मिळवावे असे विचार व्यक्त केले.

यावेळी ओबीसी अधिकार मंचचे संयोजक खेमेंद्र कटरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील अनेक ओबीसी संघटनांनी राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुरावा व आंदोलनामुळे सरकारला दखल घ्यावी लागली. सरकारला वसतिगृह सुरू करावे लागले. हा ओबीसींच्या एकजुटीचा विजय आहे.१९९९ पासून ओबीसी संघटना वसतिगृहाच्या मुद्यावर आंदोलन करीत होते.आज हे वसतिगृह सुरु होत असल्याने आम्हाला आनंद असून आम्ही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतो,असे म्हणत सरकार तालुकास्तरावर पहिल्या टप्यात १०० वसतिगृह सुरु करावे,सोबतच ओबीसींची जातनिहाय जनगणना करुन समाजाचा सर्वांगीण विकास साधावा असे विचार व्यक्त केले.भाजप ओबीसी आघाडीचे गजेंद्र फुंडे यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.

राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी प्रत्येकी एक वसतिगृह याप्रमाणे गोंदिया जिल्ह्यात आज दोन शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले. सदर वसतिगृह हे सध्या भाड्याच्या इमारतीत सुरू करण्यात आले आहे. सध्या मुलींच्या वसतिगृहात ५३ मुली प्रवेशित झाल्या असून मुलांच्या वसतिगृहात २६ मुले प्रवेशित झालेले आहेत, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विनोद मोहतुरे यांनी प्रास्ताविकातून दिली. संचालन समाज कल्याण निरीक्षक स्वाती कापसे यांनी केले.

कार्यक्रमाला ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम. करमकर,डाॅ.गुरुदास येडेवार,रमेश ब्राम्हणकर,भुमेश शेंडे, ओबीसी अधिकार मंचचे कैलास भेलावे,नरेश परिहार,उमेश कटरे,हेमराज भेलावे,भुवन रिनाईत,कमल हटवार,अशोक पडोळे,सुधीर गायधने,ओबीसी संघर्ष कृती समितीचे एस.यु. वंजारी,प्रा.संजीव रहागंडाले रामेश्वर बागडे,भागचंद रहागंडाले, रवी भांडारकर,भारतीय पिछडा शोषीत संघाचे प्रेम साठवणे, युवा बहुजन विचार मंचचे सुनिल भोंगाडे, डाॅ.गराडे, समाजसेविका डाॅ.सविता बेदरकर,प्रा.दिशा गेडाम,मुनेश्वर कुकडे,रविंद्र तुरकर,गौरव बिसेन,विभागाचे अधिकारी कर्मचारी, इतर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुले-मुली व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिलांनी उद्योग क्षेत्रात भरारी घ्यावी - आमदार चंद्रशेखर बावनकुळे

Fri Oct 11 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत प्रत्येक क्षेत्रात यशाचे शिखर गाठत आहे.त्याचप्रमाणे आता महिलांनी उद्योग व्यवसायात मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची गरज आहे तर महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महिला सक्षमीकरण करण्यासाठी लवकरच कामठी शहरात 2 गारमेंट क्लस्टर उभारणार असल्याचे मौलिक प्रतिपादन विधानपरिषद सदस्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर परिषद कामठी अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com