संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 21 :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या नवीन कामठी पोलीस स्टेशन तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे नुकतेच नव्याने बदलीवर आलेले दोन्ही वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी शहरात औचित्याचा मुद्दा असलेला अवैध गोवंश व्यवसायावर आळा घालण्याच्या कारवाहीचा सपाटा सुरू केला आहे तसेच शहरातील काही अवैध व्यवसायिकांना सामंजस्याची पाठ थोपटून अवैध व्यवसाय बंद करण्याचे फर्मान सोडत अलटीमेटम सुद्धा देण्यात आले आहे.मात्र येथील अवैध धंदे काही पोलिसांच्या आशीर्वादाने अजूनही जोमात सुरू आहेत.
नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानल्या जाणाऱ्या कामठी तालुक्यातील शहराचा भाग हा नागपूर शहर पोलीस आयुक्तालय विभागात समावेश असून ग्रामीण भाग अजूनही ग्रामीण पोलिस विभागाशी जोडलेला आहे . तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात अवैधरित्या दारू विक्रीला मोठ्या प्रमाणात जोम आला असून पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेले अवैध देशी व मोहफुल दारु विक्री ची दुकानात पहाटे पासून च विक्री होत असल्याने या दारूच्या व्यसनाला बळी पडलेली तरुणांई नशेच्या खाईत जाऊन स्वतःचे जीवन उधवस्त करीत आहे तर पोलीस मात्र फक्त स्वतःची झोळी भरण्यात धन्य आहे. यामुळे कामठी तालुक्यात ‘चहापूर्वीच मिळतो दारूचा घोट ‘ या चर्चेला उधाण आहे.तेव्हा नवनियुक्त पोलीस निरीक्षक यांच्या माध्यमातुन या अवैध दारू विक्रीवर लगाम लागनार का?असा प्रश्न येथील जागरूक नागरिक करोत आहेत.
एकीकडे नागपूर शहर पोलीस आयुक्तालय चे नवीन कामठी व जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नव्याने आल्याचा जोम दाखवत कितीही कारवाही केल्याचा देखावा करीत असले तरी काही पोलीसामुळे नागरिकांकडून पोलीस विभागाचे करणाऱ्या या कौतुकाला गालबोट लावण्यात येत आहे कारण काही भ्रष्ट पोलिसांना मिळत असलेल्या चिरीमिरीमुळे याच पोलीस दादाकडून अवैध दारू विक्री व्यवसायिकांची पाठराखण केली जाते तर कामठी शहरातील बहुतांश भागात अवैधरित्या मोहफुल तसेच देशी दारु विक्री चा व्यवसाय सुरू असून रात्री कितीही वाजता गेले तरी यांच्याकडून दारू चा घोट मिळत असतो तर पहाटे पासूनच बिनधास्त पणे दारू विक्री करोत असल्याने जणू काय पोलिस विभागाने यांना परवाना दिला असेल असे परवानाधारक दारूविक्रेते असल्याचे गृहीत धरून दारू विक्री करोत असतात तर या दारूच्या आहारी गेलेले कित्येक तरुण मंडळी सकाळी उठून चहा घेण्यापेक्षा आधी या दुकानातून दारूचा घोट प्यायला जाऊन मनसोक्त करीत स्वतःच्या आयुष्याशी खेळ खेळत आहेत तर दुसरीकडे पोलीस दादा या अवैध दारू व्यावसायिकासोबत अर्थपूर्ण संबंध ठेवून पाठराखण करोत अप्रत्येक्ष दारू विक्रीचा परवाना दिल्याचे वर्तन करीत आहेत.तेव्हा या अवैध दारू व्यवसायिकांच्या मुसक्या बांधणार कोण?असा सवाल येथील जागरूक नागरिक करीत आहेत.