नागपूर :- ठाणे येथील, योग शिबिरामध्ये योगगुरू रामदेव बाबांनी महिलांच्या बेताल व्यक्तव्या विरोधात, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकारी मनीषा पापडकर यांच्या नेतृत्वामध्ये सक्करदरा येथील पतंजली शोरुमपुढे आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्यात आले. शहर अध्यक्ष विशाल बडगे व चंदू लाडे यांच्या मार्गदर्शनात महिला सेनेच्या मनीषा पापडकर यांच्या नेतृत्वात नागपूर शहरातर्फे तीव्र विरोध दर्शवून ठाणे येथील योग शिबिरामध्ये महिलांविषयी अभद्र व्यक्त केल्यामुळे मनसेच्या महिला या आक्रमक झाल्या. मनुष्याच्या आक्रमक भूमिकेमुळे बाबा रामदेव यांना माफी मागावी लागली यानंतर स्वतःला संत म्हणून घेणाऱ्या रामदेव बाबांनी लक्षात ठेवावं की, पतंजली शोरूम चालवायची असेल तर महिलांचा मानसन्मान करावा अन्यथा पतंजली शोरूमच्या काचा फुटतील व शोरूमला काळे फासल्या जातील. योग शिबिर बंद पाडण्यात येतील, भारतातील प्रत्येक स्त्री ही भारतमाते समान आहे. महिलेचा अपमान कदापिही सहन केल्या जाणार नाही, बाबा रामदेव यांच्या पोस्टरवर शाही फेकून जोडे मारून मनसेच्या महिलांनी निषेध आंदोलन केले, मनसेच्या आक्रमक भूमिकांमुळे शोरूमचे मालक शोरूम बंद करून पळाले या व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री यांची पत्नी अमृता फडणवीस सुद्धा उपस्थित होत्या. परंतु या वक्तव्यावर काही न बोलता स्मित हास्य करत होत्या. यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो तेव्हाच रामदेव बाबा यांच्या कानशिलात यांनी मारायला पाहिजे होती, परंतु अत्यंत खेदाची बाब आहे की, महिला असून सुद्धा महिलांचा मानसन्मान राखता येत नाही ? यानंतर महिलांविषयी अभद्र व्यक्त करू नये अन्यथा पतंजली प्रॉडक्ट वापरण्यावर बहिष्कार घालण्यात येणार. यावेळी शहराध्यक्ष विशाल बडगे, शहराध्यक्ष चंदू लाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
दक्षिण विभाग अध्यक्ष अंकित झाडे, उमेश उत्तखेडे, प्रशांत निकम, तुषार गिर्हे, घनश्याम निखाडे, अर्चना कडू, मनीषा पराड, मंजुषा पानबुडे, पुनम चाडगे, मीनल शितोळे, रचना गजभिये, कल्पना चव्हाण, सुनिता कैथल, सुनिता बोडके, स्नेहा खोब्रागडे, श्वेता कोठेकर, माधवी गायकवाड, अर्चना सुफले, सुनिता डेहारे, गोकुल वरेकर, पंकज खिची, अजय मोहाडीकर, ओमकार चन्ने, प्रज्वल देशमुख, मयुर राऊत, अक्षय बिलवणे, अजय मोराडे, अतुल कोरे, ललित तांडे, लखन चोरमार, राजेश भिसे, सुनील हरीणखेडे, चेतन बोरकुटे, चेतन शिराळकर, विभाग उपाध्यक्ष नितीन बोभाटे, शुभम पिंपळापुरे, महाराष्ट्र सैनिक राज आंभोरे, शुभम श्रीवास्तव, मंगेश भांडर्गे, राज बईर, पीयूष गिरडकर, निकेश अतकरी, प्रणव आरेकर आणि बरेच मनसे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.