डेबु सावली वृध्दाश्रमातील सर्व गणमान्य ‘हद्द एक मर्यादाच्या कृतज्ञता सोहळयाने भारावले..!

चंद्रपूर :-चंद्रपुरातील पहिला मराठी, डिजीटल चित्रपट “हद्द ” एक मर्यादा यांचे निर्माते , सहकलावंत संपूर्ण परिवारासमवेत एक छोटेखानी कार्यक्रम “कृतज्ञता सोहळा” स्थानिय देवाडा येथिल डेबू सावली वृध्दाश्रमात साजरा केला आणि सर्व वयोवृध्दाचे शुभाशिर्वाद घेतले.

सविस्तर असे कि, चंद्रपूर शहरातील हॉस्पीटल वार्ड निवासी देवा बुरडकर आणि त्यांचे सहकारी देवांग सोसायटी तूकूम निवासी प्रितम खोब्रागडे यांच्या एस के चित्रपट निर्मीती तर्फे “हद्द ” एक मर्यादा डिजीटल मराठी चित्रपटाची निर्मीती झाली .

चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आपली वचनपूर्तता करण्यासाठी एक छोटासा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात गाडगेबाबा (डेबूजी) व ज्योतिबा फुले यांचे पुजन व ‘तसबीरीला माल्यार्पण करून करण्यात आली. त्यावेळेस प्रथम सत्रात योगनृत्य संस्थापक गोपालजी मुंधडा, संस्था अध्यक्ष सुभाष भाऊ शिंदे,सेवानिवृत्त पो.उ.नि. ईश्वर खोब्रागडे , देवा बुरडकर, प्रितम खोब्रागडे , धनंजय तावाडे ,आकाश घोडमारे मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम स्वागत समारंभाद्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

सुभाष शिंदे यांनी चित्रपटाबद्दलचे आपले मनोगत अधोरेखित केले. मंच संचालन धनंजय तावाडे यांचे होते. तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणातून गोपाल मुंधडा यांनी हा चित्रपट मनाला भिडला असे गौरवोद्द्गार काढले. भाषण उपरांत चहापान, फराळ पार पडला. त्यानंतर वृध्दाश्रमातील सर्व वृद्धांनी मागणी केलेल्या भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या व दुसरेसत्र प्रारंभ होताच चंद्रपूर शहर भा.ज.पा. अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी गाडगेबाबा यांच्या तसबीरी समोर दिपप्रज्वलन व पुजन करून आरंभ केले त्यावेळी के. राजू उपस्थित होते. मंच संचालन ज्योत्स्ना निमगडे यांनी केले डॉ. मंगेश गुलवाडे यांनी चित्रपटास हवी असेल ती मदत करण्याचे अभिवचन दिले. वृद्धाश्रमातील वयोवृध्दांनी टेबलावर बसुन सुग्रास जेवणाचा आनंद घेतला. डॉ. मंगेश गुलवाडे स्वतः त्यांना प्रेमाने जिलेबी वाढत आग्रह करताना पाहुन वयोवृध्दही अक्षरक्षा ! प्रेमाने भारावले .

कार्यक्रम यशस्वी करण्यात सर्वश्री- किसन पेंदोर, विलास डोंगे, विनोद शेंडे, मनोज तोकला, नरेश बुरडकर, अमित शास्त्रकार, रमेश तांडी, आबिद शेख, अफरोज पठाण, प्रकाश परमार, बंडूभाऊ आवळे, शुभम भगत, प्रदीप निमगडे, नंदु सोनारकर, मृणाल कांबळे, किरण प्रितम खोब्रागडे, शुभांगी देवीदास बुरडकर्, सरोज नरेश बुरडकर, प्रेमिला ईश्वर खोब्रागडे ,सुलोचना रमेश बुरडकर ,सोनाली संजय खोब्रागडे व वयोवृद्ध गणमान्य आणि देवाडा ग्रामस्थ यांनी संपूर्ण सहकार्य केले .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Wed Nov 16 , 2022
विद्यापीठाचा पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग आणि आर.डी.आय.के. महाविद्यालय यांचा संयुक्त उपक्रम अमरावती :-  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग आणि आर.डी.आय.के. महाविद्यालय, बडनेरा यांचे संयुक्त विद्यमाने 39 वी आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेचे भव्य आयोजन विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर करण्यात आले असून स्पर्धेचे उद्घाटन युथ वेलफेअर सोसायटी, अमरावतीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!