कामठी शहरातील झोपडपट्ट्या गुन्हेगारांचे आश्रयस्थान

कामठी :- कामठी शहर म्हणजे सर्वधर्मीय नागरिकांची एक मोठी वस्ती. या शहराला सन 1990-92मध्ये जातीय दंगलीचे कलंकही लागले आहे आणि तेव्हपासून पोलिस खात्याच्या रेकार्ड मध्ये कामठी शहर हे एक अतिसंवेदनशील शहर म्हणून नोंद झाली आहे.कामठी शहरात हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध धार्मिय नागरिक समप्रमाणात वास्तव्यास असून इतर जाती जमातीचेही नागरिक येथे वास्तव्यास आहेत. शहरात एकीकडे मिलिटरी छावणी तर दुसरिकडे ड्रॅगन पॅलेस टेम्पल तसेच इतर धार्मिक स्थळे व शासकीय कार्यालये आहेत. कामठी शहरात ज्या संख्येत मोठ्या इमारती आहेत त्याचप्रमाणे येथे झोपडपट्ट्याही आहेत आणि दाट वस्ती आहेत.शहरातील या झोपडपट्टीत काही असामाजिक तत्व ,संशयित आरोपी मोठ्या प्रमाणात असून परराज्यीय नागरिकांचेही येथे वास्तव्य आहे. शहरातील बहुतांश भागात हे परराज्यीय भिक्षा मागताना दिसतात त्यामध्ये वृद्धांची ही संख्या आहे. वास्तविकता शहरात भिक्षा मागणारे हे वृद्ध नागरिक कुठुन आले त्यांची संख्या किती असे अनेक प्रश्न येथील जनतेला पडले आहेत तर येथील झोपडपट्ट्या हे परराज्यीय नागरिकांसह गुन्हेगारांचे आश्रयस्थान होत चालले आहेत.

..शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढीवर आहे.गुन्हेगारांच्या संख्येतही आजमितीस मोठी वाढ होत चालली आहे वास्तविकता हे गुन्हेगारी वृत्तीचे लोकं कुठे राहतात,कुठून येतात त्यांचे वास्तव्य कुठे आहे याचा उलगडा झाला नसला तरी हे गुन्हेगार शहरातील झोपडपट्ट्यामध्येच वास्तव्यास असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.कित्येक गुन्हेगार वृत्तीचे लोकं बाबागिरीचे व भिक्षा मागण्याचे सोंग धरून रेल्वे स्टेशन मार्गावर दिसून येतात .या झोपडपट्ट्या मधूनच ते असामाजिक कृत्य करीत असल्याचे बोलले जात आहे.

कामठी पोलिसांकडून झोपडपट्ट्यामध्ये धाडी टाकल्या जात नसल्याने या गुन्हेगारांना झोपडपट्टीचा आश्रय उपयुक्त ठरला आहे. शहर पोलिसांनी या झोपडपट्ट्यामध्ये शोधमोहीम सुरू केली तर अनेक गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागू शकतात मात्र याकडे कामठी पोलीस विभागाचे दुर्लक्ष असून आजही कामठी शहरात असे असामाजिक तत्व सर्रास वावरत असून बेधडक गुन्हे करीत आहेत.

या झोपडपट्टीमध्ये सर्वच गुन्हेगारी वृत्तीचे असेलच असे नाही कारण दिवसभर भिक्षा मागून ,कबाडकष्ट करून, मोलमजुरी करून झोपडपट्टीतील अनेक रहिवासी आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची संख्या येथे भरपुर आहे मात्र या झोपडपट्टी मधील गुन्हेगारामुळे या कष्टाळू आणि मजबुरीने झोपडपट्टीत राहावे लागत असलेल्या लोकांवर भविष्यात विचित्र प्रसंग ओढवू शकतो. त्यामुळे पोलीस विभागाने त्वरित यावर उपाययोजना करून झोपडपट्टीमधील सर्वसामान्यांना वेठीस न धरता गुन्हेगारांनाच शोधुन काढावे अशी मागणी जोर धरत आहे.

@ फाईल फोटो

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com