संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे दिनांक ७ ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता सेठ केसरीमल पोरवाल यांचा स्मृतिदिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कृपाल तुमाने (लोकसभा सदस्य )रामटेक हे उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून परिणय फुके, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहे. ह्या स्मृती दिवसाच्या निमित्ताने राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. वादविवाद स्पर्धेचा विषय ” ह्या सभेच्या मते स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात भारत हा खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर राष्ट्र बनला आहे. ” हा ठेवण्यात आला आहे. याप्रसंगी वादविवाद स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार दिले जातील. या सोहळ्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ कामठीचे अध्यक्ष सुनीलकुमारजी पोरवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण, उपप्राचार्या डॉ.रेणू तिवारी, कार्यक्रमाचे समन्वयक उपप्राचार्य डॉ. मनिष चक्रवर्ती,तसेच एस.पी.एम. चे पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित राहणार आहेत. तसेच इतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी बहुसंख्य संख्येने ह्या वादविवाद स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण यांनी केले आहे.