दोन आठवड्यानंतर कामठी नगर परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

– नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे इच्छुकांच्या नजरा

कामठी ता प्र 3 :- नगर पालिकेत प्रलंबित असलेला ओबीसी आरक्षण आणि राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातील याचिकांची सुनावणी सुप्रीम कोर्टात आता दसऱ्यानन्तर होणार आहे.राज्य सरकारने दोन आठवडे वेळ मागितली होती त्यावर सर्वोच्च न्यायालयाने वेळ वाढवून देण्यास राज्य सरकारला मंजुरी दिली आहे त्यानुसार दोन आठवड्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे त्यानुसार येत्या दोन आठवड्यानंतर कामठी नगर परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे तसेच नुकतेच जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून येत्या दोन दिवसात पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण निघणार आहे तर त्यानंतर लवकरच नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होणार आहे तेव्हा कामठी नगरपरिषद च्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण निघणार तरी काय?याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण घोषित झाले आहे त्यामुळे आता नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे इच्छुक उमेदवारांच्या नजरा लागल्या आहेत,यासंदर्भात कामठी नगर परिषदमध्ये सन 2002 मध्ये जनतेतून निवडून आलेल्या एस सी प्रवर्गातील नगराध्यक्षपदाचे उमेदवार मायाताई चवरे समाजवादी पक्षातून निवडुंन आल्या नव्हत्या त्यामुळे आता 20 वर्षे कालावधी लोटल्या नंतर यानिवडणुकीत नगराध्यक्षपदाचे आरक्षण एस सी निघणार असा दावा चर्चेतून ठोकण्यात येत असला तरी ही आरक्षण सोडत खुद्द राज्य सरकारलाच काढावी लागणार आहे त्यामुळे ‘राजा बोले दाढी हाले’अश्या म्हणीप्रमाणे झाले तर एस सी आरक्षण वगळून सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील आरक्षण निघेल याही चर्चेला उधाण आहे.

राज्यात नवीन सरकार आल्यानंतर घेतलेल्या पहिल्या काही महत्वाच्या निर्णयामध्ये जनतेतून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडण्याचा निर्णय घेण्यात आला.नगरसेवकामधून नगराध्यक्ष निवडण्याची महाविकास आघाडी सरकारने आणलेली पद्धत रद्द करण्यात आली होती तसा अध्यादेश राज्य सरकारने लगेच काढला होता .विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यासंबंधीचे विधेयक मंजूर करवुन घेत निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.आयोगाने मार्गदर्शन केल्यानुसार नगराध्यक्ष साठीची आरक्षण सोडत ही राज्य सरकारलाच काढावी लागणार आहे त्यानुसार ती राज्य सरकारने काढावी आणि कोणत्या ठिकाणी कोणते आरक्षण घडलेले आहे याची माहिती आयोगाला द्यावी त्या आधारे पुढील कारवाही केली जाणार आहे त्यामुळे लवकरच नगर परिषद चा अध्यक्षपदाचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बिलकीस बानो प्रकरण 'फास्ट ट्रॅक कोर्टात' चालवा! -शहराध्यक्ष दीपक वासनिक..

Mon Oct 3 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – वंचित बहुजन आघाडीची मागणी  कामठी ता प्र 3 :- गुजरातमधील बिलकीस बानो प्रकरणात दाखल याचिकेवरील सुनावणी शीघ्रगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्टात) चालवून न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी कामठी शहर च्या वतीने स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे तेव्हा या स्वाक्षरी अभियानात जास्तीत जास्त नागरिकानी सहभागी व्हावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे कामठी शहराध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights