चंद्रपुरात उत्साहात साजरा झाला गणपती विसर्जन सोहळा…

एकूण ८३५९ गणेशमूर्तींचे विसर्जन, पहाटे ६ पूर्वी रस्ते स्वच्छ.

चंद्रपूर  :- गेल्या १० दिवसांपासून मोठय़ा भक्ति भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला. मोठ्या १०९ मूर्तींसह विसर्जनाच्या दिवसापर्यंत एकूण ८३५९ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. चंद्रपूर शहर महानगरपालिका, पोलीस विभाग,जिल्हा प्रशासन यांच्या योग्य नियोजनाद्वारे सोहळा पार पडला. पहाट होण्यापूर्वीच शहरातील मुख्य रस्त्यांची सफाई करण्यात आली.

विसर्जनाच्या दिवशी चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने बाहेर पडत लाडक्या बाप्पाला उत्साहाने निरोप दिला. याप्रसंगी गणेश विसर्जनाच्या मुख्य स्थळांकडे जाणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करून चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारा लहान मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. प्रशासनातर्फ़े जटपूरा गेट वरून बाप्पांवर पुष्पवृष्टी करून सर्व गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकींचे स्वागत करण्यात येत होते.

शहर नियंत्रण समिती अंतर्गत मनपाचे १५० अधिकारी कर्मचारी सोहळ्यासाठी कार्यरत होते. पोलीस विभागास सीसीटीव्ही उपलब्ध करून दिल्याने त्यांची नियंत्रण कक्षाद्वारे मिरवणुकीवर नजर होती.आपत्ती व्यवस्थापन चमु पुर्ण वेळ तैनात राहणार असुन मोठे सर्च लाईट, फायर अँड रेस्क्यु व्हेइकल, पावर बोट,लाईफजॅकेट लाईफ सेव्हींग ट्युब्ज , क्रेनची व्यवस्था करण्यात आल्याने कुठेही अनुचित घटना घडली नाही. ईरई नदी काठावर विसर्जनासाठी ६ घाट उभारण्यात आल्याने कुठेही गर्दी झाली नाही. 

गणेश विसर्जन मिरवणुक दुपारी ४ नंतर गांधी चौकातून सुरु झाली. याप्रसंगी चंद्रपूरकर गणरायाचा नामघोष, मंत्रोच्चार, ढोल ताशांच्या गजर आणि श्रीं च्या विसर्जन मिरवणुकीच्या रथाची आकर्षक सजावट करून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत होते. यावेळेस विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, रेन वॉटर हार्वेस्टींग, पर्यावरण रक्षण, वृक्ष लागवड, प्रदूषण नियंत्रण याबाबत आकर्षक देखाव्याद्वारे जनजागृती केली. गणपतीचे आगमन – विसर्जन मार्गावर गणपती बाप्पा मोरयाचा गजर ऐकण्यास मिळत होता. गणपतीचे दर्शन घेण्याकरिता भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाली.. गणेश विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याने स्वच्छतेकरिता महानगरपालिका सफाई कर्मचारी सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत निरंतर कार्यरत होते. यासाठी विभागातर्फे त्यांना काम ३ शिफ्ट मधे वाटून देण्यात आले होते. मिरवणुकीदरम्यान स्वच्छता कर्मचारी शक्य तितक्या तत्परतेने मिरवणुकी पाठोपाठच झालेला कचरा गोळा करत होते. शहर स्वच्छ राखण्याकरिता मनपातर्फे मिरवणूक मार्गांवर कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक ठिकाणी रिकाम्या कागदी प्लेट्सचा कचरा रस्त्याला घट्ट चिपकून असल्याने ब्लिचिंग पावडरद्वारे स्वच्छता करण्यात आली.अथक प्रयत्न करून मिरवणुकीदरम्यान वाहतुकीने अस्वच्छ झालेले रस्ते सकाळी ६ वाजेच्या आत साफ करून चकचकीत करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मैक्स फैशन का नया अंदाज धरमपेठ में स्टोर का शुभारंभ संपन्न 

Sun Sep 11 , 2022
मैक्स फैशन, पुरुषों के लिए भारत का सबसे पसंदीदा फैशन ब्रांड, महिलाएं और बच्चे, फैशन के क्षेत्र को फिर से परिभाषित करने के लिए पूरी तरह तैयार हैं नागपुर :- धरमपेठ, नागपुर में अपने स्टोर के पुन: लॉन्च के साथ शहर। पूरी तरह से नई और ताज़ा विश्व स्तरीय खरीदारी के साथ नागपुर में अपने समझदार ग्राहकों के लिए अनुभव, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!