बसपा कामठी विधानसभा अध्यक्षपदी इंजिनियर विक्रांत मेश्राम यांची फेरनियुक्ती

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 4 :- नुकतेच काही दिवसांपूर्वी बसपा नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी जाहीर केलेल्या नियुक्तीला प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांनी स्थगिती दिली होती ही स्थगिती उठवित कामठी विधानसभा कार्यकारिणी फेरनियुक्ती करण्यात आली ज्यानुसार कामठी बहुजन समाज पार्टीच्या कामठी विधानसभा अध्यक्षपदी इंजि विक्रांत मेश्राम यांची फेरनियुक्ती करण्यात आली .
ही फेर नियुक्ती झाल्याबद्दल नवनियुक्त इंजि विक्रांत मेश्राम यांच्यावर सर्वत्र सामूहिक अभिवादनाचा वर्षाव होत आहे. या नियुक्तीवर इंजि. विक्रांत मेश्राम यांनी पक्षाच्या सुप्रीमो व राष्ट्रीय अध्यक्ष मायावती, राज्याचे प्रभारी एड.खा. अशोक सिद्धार्थ, दुसरे प्रभारी मा.सुरेश रैना, राज्याचे युवा प्रदेश अध्यक्ष एड.संदीप ताजने,राज्याचे प्रभारी सुनील डोंगरे, राज्याचे महासचिव नागोराव जयकर, कोषाध्यक्ष महेंद्र रामटेके, राज्याचे सचिव विजयकुमार डहाट, राज्याच्या महिलांच्या सचिव रंजना ढोरे, जेष्ठ बसपा नेते किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप मेश्राम, व स्टार प्रचारक मोहम्मद शफी यांचे आभार मानले आहे. वरील सर्व पदाधिकाऱ्यांनी पुन्हा आपल्यावर विश्वास टाकल्याबद्दल त्या विश्वासावर खरे उतरण्याची हमी इंजि.विक्रांत मेश्राम यांनी दिली आहे. विक्रांत मेश्राम यांचे अभिनंदन करणाऱ्या मध्ये विधानसभा उपाध्यक्ष चंद्रगुप्त रंगारी, सचिव रवी मधुमटके, उषा अध्यक्ष अशोक गजभिये, चिऊ मतीन अन्सारी, पूर्वा शहराध्यक्ष विनायक उके, पूर्वा महिला विंग कामठी शहराध्यक्ष सुनीता रंगारी, पुर्व शहराध्यक्ष अमित भैसारे, राजन मेश्राम, पूर्व नगरसेवक संतोष यादव, व माजी नगरसेवक विकास रंगारी, विशाल गजभिये, प्रतीभा नागदेवे, रामराव कुर्वे, दिलीप नागदेवे, अशोक मेश्राम, आदींनी अभिनंदन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आधार कार्ड शिबिरा चे आयोजन

Thu Aug 4 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   कामठी ता प्र ४ ऑगस्ट – आजादी का अमृत महोत्सव उपक्रमा अंतर्गत आनंदनगरातील समाज भवनात आधार कार्ड नवीनीकरण आणि अद्यावतीकरण करिता शिबिराचे आयोजन तहसील कार्यालय कामठीच्या सौजन्याने करण्यात आले आधार कार्ड शिबिराचे उदघाटन माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी केले या आधार कार्ड शिबिरात जवळपास ४५ आधार कार्ड नव्याने बनविण्यात आले तसेच ६० कार्डाचे अद्यावतीकरण करण्यात आले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!