सिकलसेलची लढाई जिंकण्याकरिता नव्या पिढीने जनजागृतीच्या शस्त्र हाती घ्यावे- डाॅ. अवतार गंजू

-रक्त विकार तज्ज्ञांचे निःशुल्क समुपदेशन-मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘सिकलसेल ग्रस्तांना एक हात मदतीचा’ उपक्रम

नागपुर – सिकलसेल आजाराचे लक्षण हे दिसून येत नाही तर चाचणीमधूनच ते आढळून येतात. रूग्ण हे जेव्हा वैवाहिक जिवनात प्रवेश करतात त्यावेळी त्यांनी आपल्या होणाऱ्या जिवनसाथीची सिकलसेलची चाचणी शिवाय याबाबत सविस्तर चर्चा प्रामुख्याने करणे गरजेचे आहे. कारण, पुढे त्यांच्या अपत्याला या रोगापासून दूर होण्यास मोलाची मदत होईल. एकंदरीत सिकलसेलची लढाई जिंकण्याकरिता नवीन पिढीने जनजागृतीचे शस्त्र हाती घ्यावे, असे मोलाचा सल्ला प्रख्यात वरिष्ठ हेमॅटोलाॅजीस्ट तसेच हेमटो ऑन्कोलाॅजी, अमेरिकन ऑन्कोलाॅजी इंस्टिट्यूट, नागपूरचे विभाग प्रमुख डाॅ. अवतार क्रिष्ण गंजू यांनी सिकलसेल ग्रस्तांना दिला. स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट, नागपूर तर्फे तसेच नॅशनल अलायन्स ऑफ सिकलसेल ऑरगानायजेशनच्या (नास्कोे) सहकार्याने सिकलसेल ग्रस्तांसाठी रविवारी आयोजित रक्त विकार तज्ज्ञांच्या निःशुल्क समुपदेशन-मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ‘सिकलसेल ग्रस्तांना एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित या शिबिराला मुख्य अतिथी म्हणून मेडिकलच्या माजी बालरोग प्रमुख डाॅ. दिप्ती जैन तर अध्यक्षस्थानी स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्षा लिना तामगाडगे यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर विशेष पाहुण्यांमध्ये सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा जया संपत रामटेके, नॅशनल अलायन्स ऑफ सिकलसेल ऑरगानायजेशनचे (नास्को) सचिव गौतम डोंगरे यांची उपस्थिती होती.
जयवंत नगर येथील इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी, प्राचार्य अरूणराव कलोडे महाविद्यालयाजवळील स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट मुख्यालयातील पहिल्या माळयावर आयोजित या शिबिरात पुढे बोलतांना डाॅ. गंजू म्हणाले की, सिकलसेल ग्रस्तांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही, रूग्णांनी आपले आरोग्य सुदृढ ठेवण्याकरिता नियमित औषध व उपचार घेणे गरजेचे आहे. याशिवाय निरोगी शरीर ठेवण्याकरिता जास्तीत जास्त ऑक्सिजन, सकस आहार, शारीरिक स्वच्छता आणि आवश्यक झोप घेणे गरजेचे आहे. यासर्व बाबींचा  रूग्णांसह पालकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास त्यांना रूग्णालयात भरती होण्याची गरज पडणार नाही, असेही यावेळी डाॅ. गंजू यावेळी म्हणाले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी सिकलसेल आजाराबाबत समोयाजिच मार्गदर्शन तसेच स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टच्या सिकलसेलच्या जनजागृतीबाबत प्रशंसा व्यक्त केली. यावेळी उपस्थित शेकडो रूग्णांना डाॅ. अवतार गंजू तसेच डाॅ. दिप्ती जैन या दोघांनी उपस्थिती रूग्णांना आजाराबाबत योग्य सल्ला व उपचाराबाबत सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिती नगराळे, नास्कोचे संचालन पद्मा डोंगरे तर सचिव गौतम डोंगरे यांनी आभार मानले. स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टद्वारे ‘सिकलसेल ग्रस्तांना एक हात मदतीचा’ या अभियानाअंतर्गत आयोजित शिबिराच्या यशस्वीतेसाठी नॅशनल अलायन्स ऑफ सिकलसेल ऑरगानायजेशन (नास्कोे), इंडियन अंम्बेडकराईट डाॅक्टर फेडरेशन (आयएडीएफ), अम्बेंडकर अ‍ॅनालाईस्ट, पॅंथर पाव व मिशन टी ट्वेन्टी यांचे सहकार्य लाभात आहे.

सिकलसेल ग्रस्तांबाबत शासन उदासिन- डाॅ. दिप्ती जैन

सिकलेसल ग्रस्तांबाबत उदासिनता असल्याने कारणानेच प्रशासनाकडे रूग्णांची आकडेवारीच नसल्याने योग्य ध्येय-धोरणाचा त्यांना ठरविता आलेले नाही आहे. त्याचप्रमाणे या रूग्णांना दिव्यांगाचा दर्जा प्राप्त असतांनाही त्याबाबत संबंधीत रूग्णांनाच मुळात कल्पना नाही आहे. केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या दिशा निर्देशानुसार बऱ्याचश्या रूग्णांना याचा लाभ घेता येत नाही. यामुळे रूग्णांसह शासनही संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

स्वातंत्र्याच्या ७५ अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान 'हर घर तिरंगा' कार्यक्रमा करिता जनजागृती रॅली

Mon Aug 1 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी  राज्य राखीव पोलीस व सायकलिंग संडे द्वारा काढण्यात आली रॅली.. गोंदिया – येथील राज्यराखीव पोलीस बल गट क्रमांक १५ बिर्सी यांनी सायकलिंग संडे ग्रुप द्वारे आजादी का ७५ अमृत महोत्सव अंतर्गत रविवारी सकाळी बिर्सी येथील राज्य राखीव पोलीस मुख्यालयातुन सायकल रॅली काढण्यात आली ती गोंदिया येथील जय स्थंभ चौक येथे राष्ट्रगान गाऊन समारोप करण्यात आले. स्वातंत्र्याच्या ७५ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!