अमरदिप बडगे, प्रतिनिधी
राज्य राखीव पोलीस व सायकलिंग संडे द्वारा काढण्यात आली रॅली..
गोंदिया – येथील राज्यराखीव पोलीस बल गट क्रमांक १५ बिर्सी यांनी सायकलिंग संडे ग्रुप द्वारे आजादी का ७५ अमृत महोत्सव अंतर्गत रविवारी सकाळी बिर्सी येथील राज्य राखीव पोलीस मुख्यालयातुन सायकल रॅली काढण्यात आली ती गोंदिया येथील जय स्थंभ चौक येथे राष्ट्रगान गाऊन समारोप करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या ७५ अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविला जावा यासाठी जिल्हा प्रशासनाने काटेकोर नियोजन केले आहे. मागेल त्याला तिरंगा उपलब्ध करून देण्याचे सुद्धा नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक घर, शासकीय निमशासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालय, ग्रामपंचायत, नगरपालिका व नगरपंचायत कार्यालयावर तिरंगा डौलाने फडकविला जाणार आहे.
त्या अनुषंगाने गोंदियातील बिर्सी येथे असलेल्या राज्य राखीव पोलीस आणि सायकलिंग संडे यांच्या कडून संयुक्त रॅली काढण्यात आली व रस्त्यात येत असलेल्या प्रत्येक गावात थांबून गावकर्यांना आजादी का ७५ अमृत महोत्सव अंतर्गत माहिती दिली व घरी तिरंगा कसे फडकावाचे या बदल देखील माहिती दिली.