संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 30 :- नागपूर महानगरपालिकेत नोकरीवर असलेले व नागपूर टेका नाका महेंद्रनगर रहिवासी इसम हे मागील काही दिवसांपासून असलेल्या नैराशेतून 27 जून पासून घरून बेपत्ता झाले असता चक्क त्यांचा मृतदेहच कन्हान नदीत आढळल्याची घटना आज सकाळी 10 दरम्यान निदर्शनास आली असून मृतकाचे नाव सुधाकर मेश्राम वय 55 वर्षे रा महेंद्रनगर नागपूर असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा 27 जून पासून घरून बेपत्ता झाल्याने घरमंडळींनी नजीकच्या पोलीस स्टेशन ला मिसिंग ची तक्रार नोंदवित शोधकार्याला गती दिली मात्र कुठेही थांगपत्ता लागला नव्हता तर आज सकाळी 10 दरम्यान या बेपत्ता इसमाचा चक्क मृतदेहच आढळला .सदर मृतदेह नदीत तरंगताना दिसला असता जीवन रक्षक दल चे संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम यांच्या मार्गदर्शनात कार्यकर्ते नितेश केवट,रोशन मेश्राम महादेव केवट यांनी प्रेत नदीबाहेर काढून नवीन कामठी पोलिसांच्या स्वाधीन केले.याप्रसंगी पोलीस कर्मचारी संजय पिल्ले, राजीव टाकळीकर आदींनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.सदर घटनेसंदर्भात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी मृतकाने नैराश्येतून कन्हान नदीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.