इतर मागास प्रवर्गाची मते जाणून घेणार
नागपूर, दि. 26 : समर्पित आयोगाच्या भेटीच्यावेळी नागरिकांना आपली मते वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी शुक्रवार, दिनांक 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत करायची असून एकच दिवस नोंदणीसाठी राहिला आहे. नागरिकांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले ओ.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती तसेच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गात (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग स्थापन केला आहे. समर्पित आयोग शनिवार, दिनांक 28 मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांची मते जाणून घेणार आहेत.
ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने शनिवार, दिनांक 28 मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सायंकाळी 4.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत नागरिकांची मते जाणून घेणार आहेत.
नाव नोंदणीसाठी एक दिवसाची प्रतिक्षा ; समर्पित आयोग शनिवारी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com