कोरोना वाढतोय, मास्क वापरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले.  राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी 1.59 टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी  आढळते.   मुंबईत रुग्णसंख्येत 52.79 टक्के वाढ झाली असून ठाण्यामध्ये 27.92 टक्के तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात 18.52 टक्के 68.75 टक्के इतकी वाढ झाली आहे.

 

            सध्या केवळ एक रुग्ण व्हेंटिलेटरवर असून 18 रुग्ण ऑक्सिजनवर आहे.  रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी असली तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही हे लक्षात घेऊन सर्वांनी सावधगिरी बाळगणे आणि त्यासाठी मास्क घालत राहणेलस घेणे आवश्यक आहे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.  सध्या 18 पेक्षा अधिक वयाच्या 92.27 टक्के लोकांना एक डोस देण्यात आला आहे.  चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले असून ते वाढविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

काँग्रेस पार्टी मे एक पद नियम का सम्मान

Thu May 26 , 2022
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव शकुर नागाणी ने नसीम खान को पुष्पगुच्छ देकर किया सत्कार कामठी ता प्र 26 – काँग्रेस का हात हर गोरगरीब, किसान,बेरोजगार के साथ यही तर्ज पर एक व्यक्ती एक पद का सम्मान कर नसीम खान ने दुसरे पद का इस्तीफा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी के कार्यकारी अध्यक्ष नसीम खान ने हाल ही मे अखिल भारतीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com