नागपूर :- दिनांक ०८,०७,२०२३ रोजी पोलीस ठाणे यशोधरानगर येथील तपास पथक पेट्रोलीग करीत असता संघर्ष नगर येथे एका स्कोडा गाडीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले तंबाकुजन्य पदार्थ विक्री करीता, पॅकिंग करून साठा करून ठेवल्याचे खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन धाड टाकली असता नमुद ठिकाणी आरोपी १) रजत राजेंद्र बोनगिरी, वय २५ वर्ष, रा. गौतम नगर, डिलक्स सलुन जवळ, गड्डीगोदाम सदर, २) मोहित खान मुजफर खान, वय २४ वर्ष, रा. जुबेर मेडीकल जवळ, पठानपुरा, नागपूरी गेट, अमरावती हे दोघे स्कोडा कपनीची कार क. एम. एच. ०६ ए ३३५७सह मिळुन आले. त्यांचे ताब्यातुन विवीध प्रकारचे सुगंधीत प्रतिबंधीत तंबाखू तसेच पान मसाले, बाबा, ब्लॅक सागर, शक्ती, रत्ना, बागवान, राजश्री गुटखा, रजनीगंधा, पानपराग, पानवहार, इतर वस्तु व स्कोडा वाहन किमंती ७ लाख रूपये असा एकूण ९,५०,०२४/- रू. चा मुद्देमाल मिळून आला. आरोपीचे ताब्यातुन संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे यशोधरानगर येथे कलम १८८ २७३ ३२८ भादंवी सहकलम ५९, अन्न व सुरक्षा मानके अधिनीयम अन्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. वरील कामगिरी पोलीस उपआयुक्त परि ५ नागपूर, सहा. पोलीस आयुक्त, जरिपटका विभाग, नागपूर शहर, ज्ञानेश्वर भेदोडकर वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पो.ठाणे यशोधरानगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मोटे, पोउपनि सचिन भालेराव, सिरसाट, पोहवा श्याम कडु, अमोल बांबुळकर पो.अ नारायण कोहचाडे, अमित ठाकुर, नरेंद जंभुळकर, रामेश्वर गेडाम, किशोर बोटे, रोहीत रामटेके, योगेश इप्पर, अरशद शेख यांनी केली आहे..
प्रतिबंधीत तंबाखू विक्री करीता साठा करणाऱ्या आरोपींना अटक, ९,००,०२४/- रू. चा मुद्देमाल जप्त
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com