कोराडी :-74 व्या संविधान दिवस, ग्रा, पं च्या कार्यालयात बोखाराचे प्रथम नागरीक भाऊराव गोमासे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला़.यावेळी ग्रा, पं, सदस्य, नरेंद्र खोटे, उपसरपंच, वहीदभाई,, ग्रापं सदस्या गोठवाड, ग्रापं, वर्होकर, तसेच ग्रापं कर्मचारीगण, आंगणवाडी सेविका, मदतणिस, प्रामुख्याने उपस्थित होते.
सरपंच भाऊराव गोमासे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांनी सांगीतले की, बाबासाहेब आंबेडकरांना संविधान तयार करतांनी अनेक देशांच्या घटना चा सांगोपांग अभ्यास करून सर्व जातीधर्मातील नागरीकांच्या मूलभुत हक्कांचे रक्षण करणारे समाजोपयोगी कायदे तयार केलेत, संविधान एक आपल्या देशाला दिलेले एक लिगल डाँक्युमेंटस आहेत, सर्वच, शासकीय कार्यालयात शासनाने त्याची प्रस्ताविका पाठन करावी असे गोमासे सरपंच यांनी प्रतिपादन केले, सर्वाना अल्पोहार देवून कार्यक्रमाची सांगता झाली.
याशिवाय कोराडीचे सरपंच नरेंद्र धनूले, यांनी संविधान दिनानिमित्त कार्यालयात बाबासाहेब यांना अभिवादन केले, तसेच नगराध्यक्ष महादूला राजेश रंगारी यांनी त्यांच्या सर्व कार्यालयीन कर्मचारी व उपाध्यक्ष नगरसेवकासह संविधान प्रस्ताविका चे वाचन केले.