२ मार्च रोजी मनपाचा ७३ वा स्थापना दिन

नागपूर :-भारताचे झिरो माईल अशी ओळख असलेले व भारताच्या मध्यभागी वसलेल्या नागपूर शहराची पालकसंस्था नागपूर महानगरपालिकेला शनिवार २ मार्च २०२४ रोजी ७३ वर्षे पूर्ण होत आहेत. “पौर जन हिताय” या ब्रीद वाक्याला निरंतर जपणारी नागपूर महानगरपालिका नागरिकांच्या अविरत सेवेत तत्पर आहे. मनपाच्या ७३ वा स्थापना दिनानिमित मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी समस्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मनपाचा ७३ वा स्थापना दिन हा शनिवार २ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता , सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयातील हिरवळीवर साजरा केला जाणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी हे कार्याक्रमाचे मुख्य अतिथी तर अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, डॉ. सुनील लहाने हे विशेष अतिथी असणार आहेत. नागरिकांनी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन मनपाचे उपायुक्त निर्भय जैन यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनाथ बालकांसाठी ५ मार्चपर्यंत ‘अनाथ पंधरवाडा’

Fri Mar 1 , 2024
यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनाथ बालकांसाठी ५ मार्चपर्यंत अनाथ पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण कक्षामध्ये समर्पित कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेता यावा व अनाथ प्रमाणपत्र काढण्यासाठी मदत केली जाणार आहे. एक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights