– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. शुक्रवारी (ता. 31) रोजी उपद्रव शोध पथकाने 69 प्रकरणांची नोंद करून 36 हजार 600 रुपयाचा दंड वसूल केला.
शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करुन 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 6 हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 2 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मॉल, उपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 4 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करून 4 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून 3 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून 14 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 03 प्रकरणांची नोंद*
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे शुक्रवारी (ता. 31) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या धरमपेठ झोन अंतर्गत ताज ट्रेडर्स काटोल रोड, गांधीबाग झोन अंतर्गत अजय ट्रेडर्स सुत मार्केट व सतरंजीपुरा झोन अंतर्गत वाघमारे किराणा स्टोर्स मस्कासाथ ईतवारी या तीन प्रतिष्ठांनाकडुन एकुण 15 हजार रुपयाचा दंड वसूल केला. नेहरुनगर झोन अंतर्गत फ्रुलेटो ड्रिंग शॉप नवीन नंदनवन मेन रोड यांच्याकडून हॉटेलचा कचरा रस्त्यालगत टाकल्याबाबत 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशीनगर झोन अंतर्गत अभिनव कॉन्वेंट समता नगर यांच्याकडुन परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 5 प्रकरणांची नोंद करून 25 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.