चंद्रपूर :- महाकाली यात्रेत भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्राचा लाभ ५३९३ इतक्या भाविकांनाही घेतला असुन मनपातर्फे पुरविण्यात आलेल्या सुविधांवर समाधान व्यक्त केले आहे. निःशुल्क प्रथोमपचार वैद्यकीय सेव देण्यास मनपा आरोग्य पथक पुर्ण वेळ उपस्थित असुन २४ तास रुग्णवाहिका यात्रा क्षेत्रात उपलब्ध आहे. अंचलेश्वर ते बागला चौक व गौतमनगर ते तुळजाभवानी मंदिर क्षेत्र हा महाकाली यात्रेचा परिसर असुन या पुर्ण भागात महाकाली यात्रेसाठी चोख व्यवस्था चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात आली आहे. महानगपालिका प्रशासनातर्फ़े सुरवातीलाच झरपट नदी पात्रातील इकोर्निया वनस्पती काढून पात्र स्वच्छ करण्यात आले होते. भक्तांकरिता मांडव, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, भूमिगत पाईप टाकुन पाण्याचे नळ व पाण्याचे टँकरसुद्धा मनपाद्वारे सज्ज ठेवण्यात आले आहे ज्याचा लाभ भाविक घेत आहेत. आंघोळीसाठी महिला व पुरुषांना वेगवेगळे स्नानगृह सुद्धा उपलब्ध केलेले आहे.
आंघोळीसाठी स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने शॉवरची व्यवस्था,सुलभ शौचालय, प्री कास्ट,५ फिरते शौचालय, संपुर्ण परिसरात विदयुत व्यवस्था तसेच स्वच्छतेचा लाभ मनपाद्वारे दिला जात आहे, नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास मनपाच्या ७ शाळा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अतिक्रमण निर्मुलन पथक,पोलीस चौकी,दवाखाना उपलब्ध असुन वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून झरपट बंधारा,कोहीनूर मैदान, बैलबाजार भाग, गौतमनगर सुलभ शौचालय व शासकीय अध्यापक विद्यालय जवळील जागांची पार्किंग व्यवस्था उभारण्यात आली आहे.
रयतवारी कॉलोनी परिसर हा महाकाली यात्रेच्या निश्चित स्थळाच्या बाहेरचे क्षेत्र असुन निश्चित जागी सोडुन काही भाविक इतर ठिकाणी स्नान वा इतर विधीसाठी जात आहेत,आता या ठिकाणी सुविधा या वेकोली प्रशासनातर्फे दिल्या गेल्या आहेत.