बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मिळाली रामटेक लोकसभेची उमेदवारी – राजू पारवे

 काटोल-सावनेर विधानसभा क्षेत्रात जनसंवाद रथ यात्रेचे जल्लोषात स्वागत

 पंतप्रधान मोंदींच्या शैक्षणिक धोरणाला जिल्हयात राबविणार

काटोल :-भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळेच जगातील सर्वात आदर्श भारतीय संविधानाची रचना केली. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कायेदविषयक, महिलांविषयक, शैक्षणिक आणि अत्याधुनिक दूरदृष्टीला जपणाऱ्या संविधानामुळेच मला आज रामटेक लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन रामटेक लोकसभेचे महायुतीतील शिवसेना उमेदवार राजू देवनाथ पारवे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा सुधरण्यासाठी आपण प्रयत्नरत राहू असेही ते यावेळी म्हणाले.

रविवारी काटोल विधानसभा क्षेत्रातील झिलपा गावातून जनसंवाद रथ यात्रा प्रचार दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राजू पारवे हे बोलत होते. याप्रसंगी भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवारसह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन एकता मंच, रासप तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेते, पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

राजू पारवे म्हणाले की, आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात शैक्षणिक धोरणाची क्रांतीला अधिक बळकट करण्याचे काम गेल्या दहा वर्षांत केले. केंद्रात मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार सरकार हे लोककल्याणकारी शिक्षण देण्याचे काम करीत आहे. 

 पारदर्शक परीक्षेमुळे लाखो लोकांना रोजगार

सरकारी शाळा म्हणजे केवळ सरकारची शाळा अशी राहून नये म्हणून सरकारने गाव तेथे शाळा उभारल्या आहेत. प्रत्येकाला माझी शाळा वाटावी. जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी आधुनिक साधने व सुविधा या शाळांमध्ये तयार करण्याचे काम महायुती सरकारने केली आहे. रामटेक लोकसभेत येणाऱ्या शांळामध्ये शिक्षक, विद्यार्थ्यांना सुरक्षित, सर्वसमावेशक आणि प्रभावी अध्ययन वातावरण असावे. शौचालये, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छ व आकर्षक जागा, वीज, संगणकीय उपकरणे, इंटरनेट, ग्रंथालये आणि खेळांची व करमणुकीची साधने शाळांना असावी. याकरिता आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार, असल्याचेही राजू पारवे यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात शैक्षणिक धोरणाची क्रांतीला अधिक बळकट करण्याचे काम गेल्या दहा वर्षांत केले. त्यामुळे पारदर्शक परीक्षेमुळे लाखो लोकांना रोजगार देण्याचा काम मोदीजींच्या सरकारने केले. विकासाची गती व पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीवर विश्वास ठेऊन रामटेकच्या ‘धनुष्य बाण’ला संसदेत पोहचविण्याचे आवाहनही राजू पारवे यांनी केले.

 झिलपा, येनवा, मोहपा, केळवद गावात पदयात्रेत गावकऱ्यांचा सहभाग

काटोल-सावनेर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या झिलपा, येनवा, मसली, दिग्रस बु., येरला धोटे, सिंदी उमरी, के. पिपळा, कोंढाळी, मोहपा, उमरी नांदा, केळवद या गावात जनसंपर्क पदयात्रा आणि कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले. या जनसंवाद रथ यात्रेचा पाटनसावंगी येथे रात्री झालेल्या भव्य प्रचार सभेनंतर समारोप झाले. तत्पूर्वी, प्रत्येक गावातील मुख्य चौकात आणि वस्तीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), बहुजन रिपब्लिकन एकता मंच, रासपसह महायुतीच्या घटक पक्षातील शेकडो कार्यकर्ते तसेच नागरिकांचा सहभागाने जनसंवाद रथ यात्रा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पूर्व नागपुरात गडकरींचे दमदार स्वागत!,शेकडो कार्यकर्त्यांच्या गर्दीने बहरली लोकसंवाद यात्रा

Mon Apr 15 , 2024
नागपूर :- कडाक्याच्या उन्हातही शेकडो कार्यकर्त्यांच्या उत्साहाने गडकरींची पूर्व नागपुरातील लोकसंवाद यात्रा गाजली. जवळपास साडेपाच तास चाललेल्या या यात्रेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांचे जागोजागी दमदार स्वागत झाले.सतरंजीपुरा येथील सुनील हॉटेल समोर लोकसंवाद यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, माजी नगरसेवक बाल्या बोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com