अधीक्षक डाकघर,नवीमुंबई विभाग वाशी क्षेत्रात 51 रिक्तपदे भरली जाणार

नवी मुंबई :- भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी अधीक्षक डाकघर,नवीमुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील 51 रिक्त पदे भरली जाणार असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर,नवीमुंबई विभाग वाशी यांनी केली आहे.

तरी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आपले अर्ज अधिक माहितीसाठी नियम व अटी पुढील संकेतस्थळावर ऑनलाईन https://indiapostgdsonline.gov.in अर्ज भरण्याची शेवटची दि.05 ऑगस्ट 2024 पर्यंत व त्यापूर्वी ऑनलाईन करावेत. उमेदवारांचे इतर कोणत्याही मांध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिश (हस्तेपोच) आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या सूचनेनुसार शुल्क फी भरावे लागेल.

पोस्ट विभाग उमेदवारांना कोणताही फोन कॉल करत नाही. सबंधित प्राधिकरणाद्वारेचे सदर उमेदवारांशी,पत्रव्यवहार जर असेल तर केला जातो. उमेदवारांनी वैयक्तिक माहिती/ नोंदणी क्रमांक/मोबाईल क्रमांक/ईमेल आयडी इतरांसमोर उघड करु नयेत किंवा कोणत्याही अनैतिक फोन कॉल्सपासून सावध रहावे असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाकघर,नवीमुंबई विभाग वाशी यांनी एका प्रसिध्द पत्रकाद्वारे कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Fri Jul 26 , 2024
– साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्यांची मदत घ्यावी – नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई :- पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले. या घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची महानगर पालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com