स्वच्छतेसाठी सरसावले ५०० मोहल्ले

‘स्वच्छ मोहल्ला स्पर्धा’ मिळवून देईल परिसराच्या विकासासाठी निधी : मनपा आणि नागपूर@२०२५ चा स्तूत्य उपक्रम

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आणि नागपूर@२०२५ या संस्थेच्या सहकार्याने घेण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ मोहल्ला’ स्पर्धेमध्ये आतापर्यंत सुमारे ५०० मोहल्ल्यांनी सहभाग नोंदविला आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेद्वारे स्वच्छतेत उत्कृष्ट कार्य करणा-या विजेत्या मोहल्ल्यांना त्यांच्या मोहल्ल्यांमध्ये २५ लाखापर्यंतचे आवश्यक विकास कामे करण्याचे अनोखे पुरस्कार मिळणार आहे.

स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रत्येक नागपूरकराचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. स्वत:, स्वत:चे घर आणि आपला मोहल्ला असे स्वच्छतेचे पाउल पुढे टाकत गेल्यास नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही. नागपूर महानगरपालिकेने याच हेतूने नागपूर@२०२५ आणि इतर संस्थेच्या सहकार्याने ‘स्वच्छ मोहल्ला’ स्पर्धा आयोजित केली असून या स्तूत्य उपक्रमाला नागपूर शहरातील दहाही झोनमधून सुमारे ५०० मोहल्ल्यांनी नोंदणी करून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनपैकी हनुमान नगर झोनमध्ये सर्वाधिक ५८ मोहल्ल्यांनी तर त्यापाठोपाठ आशीनगर झोनमधील ५७ मोहल्ल्यांनी नोंदणी केली आहे. हनुमान नगर झोनमधील ५८ मोहल्ल्यांमध्ये १५०२४ घरे तर आशीनगर झोनमधील ५७ मोहल्ल्यांमध्ये ११२७५ घरे आहे. यापाठोपाठ गांधीबाग झोनमध्ये ५४ मोहल्ले (७७१९ घरे), लक्ष्मीनगर झोनमध्ये ५३ मोहल्ले (१०६३८ घरे), लकडगंज झोनमधील ५२ मोहल्ले (१२३०४ घरे), नेहरूनगर झोनमधील ४८ मोहल्ले (१२३०० घरे), धंतोली झोनमधील ४५ मोहल्ले (६७९९ घरे), सतरंजीपुरा झोनमधील ४३ मोहल्ले (८६३३ घरे), मंगळवारी झोनमधील ४० मोहल्ले (१२३३९ घरे) आणि धरमपेठ झोनमधील १९ मोहल्ले (१९१२५ घरे) ‘स्वच्छ मोहल्ला’ स्पर्धेत सहभागी झालेले आहेत.

नागपूर शहर स्वच्छतेच्या दृष्टीने महत्वाच्या ‘स्वच्छ मोहल्ला’ स्पर्धेबाबत जनजागृतीसाठी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, नागपूर@२०२५ चे प्रमुख शिवकुमार राव, संयोजक निमिष सुतारिया, मल्हार देशपांडे, किरण मुंधडा व अन्य अधिकारी, संस्थेचे सदस्य दररोज सकाळी शहरातील विविध उद्यानांमध्ये जाउन नागरिकांना स्पर्धेची माहिती देतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात व स्वच्छतेप्रति जनजागृती करतात.

स्वच्छ मोहल्ला स्पर्धेमध्ये २०० पेक्षा जास्त आणि ५०० पेक्षा कमी घरांचा समावेश असलेल्या मोहल्ल्यांनी सहभाग नोंदविला आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. बक्षीसांमध्ये जाहिर रक्कमेचे मोहल्ल्यामध्ये विकासकामे करण्यात येणार आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांसाठी तीन मोहल्ल्यांची निवड केली जाईल.

तिनही विजेत्या मोहल्ल्यांमध्ये प्रत्येकी २५ लाख रुपयांची असे एकूण ७५ लाख रुपयांची विकास कामे केली जातील. दुस-या क्रमांसाठी ५ मोहल्ल्यांची निवड केली जाईल व त्या मोहल्ल्यांमध्ये प्रत्येकी १० लाख असे एकूण ५० लाख रुपयांची विकासकामे होतील. तृतीय पुरस्कार ७ मोहल्ल्यांना प्रदान केले जाईल यामध्ये प्रत्येकी ५ लाख असे एकूण ३५ लाख रुपयांची विकास कामे करण्यात येतील.

मूल्यांकन करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे आणि मापदंड

१. कच-याचे वर्गीकरण, डोअर टू डोअर आणि फाटकापर्यंत हिरवा कचरा जमा करणे (ओला किंवा जैवविघटनशील कचरा)

२. कचरा दररोज मनपाच्या कर्मचा-यांकडून उचलला जायला हवा.

३. मोहल्ल्यातील प्रत्येक दुकान आणि विक्रेत्याने एकदा वापरून फेकावयाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातलेली असावी.

४. नागरिकांकडून स्वच्छता अॅपचा वापर

५. ओल्या कच-यातून कंपोस्टची निर्मिती

६. सर्व नागरिकांना, दुकानांमध्ये जागरुकता अभियान, स्वच्छतेविषयक संदेश देण्यात यावा.

७. विविध कंपन्या किंवा मनपाच्या उपक्रमांमधील बांधकामाचा कचरा परिसरात टाकण्यास बंदी आणि यासाठी परिसराची नियमित साफसफाई केली जाणे आणि त्यावर देखरेख असणे.

८. स्वच्छ उद्याने, सार्वजनिक जागा, वाहनतळ (पार्कींग) आदींची स्वच्छता

९. कचरा व्यवस्थापन / किंवा स्वच्छतेविषयक अभिनव योजना/संकल्पनांची आखणी

१०. प्राणी आणि कुत्र्यांच्या घाणीचे व्यवस्थापन

११. मनपाच्या चमूकडून सार्वजनिक शौचालयांचे व्यवस्थापन सांडपाण्यावर प्रक्रिया, सहज उपलब्धता आणि स्वच्छता

१२. ब्लॅक स्पॉट अर्थात कचराकुंड्यांचा निचरा आणि पुन्हा साचू नये, यासाठी देखरेख

१३. मोहल्ला किंवा परिसरात रस्त्यावरील विक्रेते, फिरती दुकाने आणि आस्थापनांमध्ये कचराकुंड्या

१४. लाल डाग अर्थात थुंकलेली जागा स्वच्छ करणे आणि त्यात वाढ होऊ नये, यासाठीची काळजी

१५. तीन आर म्हणजे पुनर्वापर (रियुज), वापर कमी करणे (रिड्यूस), पुनः प्रक्रीया (रिसायकल) या त्रिसूत्रीची अंमलबजावणी आणि कोरड्या कच-याचे वर्गीकरण

१६. मनपाच्या यंत्रणेच्या माध्यमातून सांडपाण्याचा निचरा

१७. नागरिक आणि स्वच्छता कर्मचा-यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कृत किंवा सन्मानित केले जाणे

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पथनाट्याद्वारे पथविक्रेत्यांना डिजिटल ऑनबोर्डिंगची माहिती

Wed Feb 15 , 2023
– मनपाचे ‘मी पण डिजिटल 4.0’ अभियान  नागपूर : शहरातील विविध बाजारपेठांमध्ये पथविक्रेत्यांना डिजिटल व्यवहाराबद्दल माहिती मिळावी याकरिता पथनाट्याद्वारे डिजिटल ऑनबोर्डिंग जनजागृती केली जात आहे. पथविक्रेत्यांचे डिजिटल ऑनबोर्डिंग आणि प्रशिक्षणासाठी मनपाच्या समाज विकास विभागातर्फे दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ” मी पण डिजिटल 4.0′ मोहीम राबविल्या जात आहे. मोहिमेची सुरुवात नागपूर महानारपालिकेच्या मुख्य इमारतीपासून झाली. यावेळी निगम सचिव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com